नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार जिल्हा उशू असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय उशु क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, पथराई ता.नंदुरबार येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी सागर शिवाजी नाईक याने ५२ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता बारावीचा विद्यार्थी हेमंत संजय रणदिवे यानेही उल्लेखनीय कामगिरी करत ७० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच४० किलो वजन गटात इयत्ता दहावीचा तीर्थराज गुलाबसिंग वसावे याने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, सचिव ऋषिका गावित,डॉ. विभूती गावित, प्राचार्य शरद पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच क्रीडा शिक्षक उमेश राजपूत,भागुराव जाधव व शांताराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.








