Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

team by team
July 2, 2026
in राजकीय
0
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तत्वाने चालून लोक कल्याण साधणारे राजकारण केले. कोणाचेही वाईट करण्याची शिकवण दिली नाही. तथापि सर्व विरोधक गावित परिवाराच्या विरोधात एकत्र येऊन लढत असले तरी काहीच बिघडत नाही.
शेवटी काहीही झाले तरी नंदुरबार जिल्ह्यात माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हेच एकमेव शेर आहेत, जनता अजूनही त्यांच्या विकास कार्याच्या पाठीशी आहे; अशा शब्दात संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आगामी निवडणुकांमधील विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला.

विरोधकांचा समाचार घेताना त्या पुढे म्हणाल्या की, लोकांच्या कामासाठी विकास निधी कसा खर्च करावा हे विद्यमान खासदारांना माहित आहे किंवा नाही? असा प्रश्न लोकांना पडला आहे. अक्कलकुव्यातील स्थानिक आमदारांनाही विकासाचा विसर पडला असून खोट्या तक्रारी आणि खोटे गुन्हे दाखल करण्यात ते मग्न झाले आहेत. अनेक समस्या आणि प्रश्न असताना त्यांनी खोट्या तक्रारी मांडण्यासाठी थेट
विधानसभेचे व्यासपीठ वापरले.

संसद रत्न माजी खासदर डॉ. हिनाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकुवा येथील जैन धर्मशाळा सभागृहात  दिनांक 30 जुन 2026 वार मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक मोर्चेबांधणी व पक्ष बळकटीकरण बैठक आणि SIR अभियान बीएलओ-1 , बीएलए प्रशिक्षण पार पडले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

*आदिवासी बोलीभषेत जनगणना एसआयआरचे महत्व सांगितले*

भाजपाचे अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी, माजी जि.प. सदस्य किरसिंग वसावे, माजी जि.प. सदस्य प्रताप वसावे, माजी जि.प. सदस्य नितेश वळवी, महेश तवर, अमृत चौधरी, माजी जि.प. सदस्य जमुना बाई वसावे, सरपंच चंपाताई पाडवी, सरपंच सौ यमुना ताई पाडवी, उपसरपंच जगदीश वसावे, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक राऊत, धनसिंग दादा, रोशनदादा आणि अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी याप्रसंगी जनगणनेचे महत्व काय? एस आय आर म्हणजे काय? हे आदिवासी बोली भाषेतून विषद केले. योजनांचा लाभ घेण्यासाठी जनगणना अंतर्गत नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रमाणे एस आय आर अंतर्गत मतदार नोंदणी आता नाही केली तर पुढे 20 वर्ष मतदानापासून वंचित रहाल, याचं गांभीर्य नागरिकांना लक्षात आणून द्या; असे आवाहन केले. ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा विधानसभा कोणत्याही क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ता असो त्यांची ही जबाबदारी आहे; असेही त्यांनी सांगितले.

*तारांकित प्रश्न मांडून आमदार कोणता विकास करताहेत?*

भाजपाचे अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशदादा पाडवी, माजी जि.प. सदस्य किरसिंगदादा वसावे, माजी जि.प. सदस्य प्रतापदादा वसावे, माजी जि.प. सदस्य नितेश वळवी यांनी देखील आपल्या भाषणातून एसआर जनगणना याचे महत्त्व विशद करण्याबरोबरच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि अक्कलकुव्यातील विरोधी आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. शाळा दवाखाना रस्ते या सदर्भाने विकास कार्य करण्याऐवजी प्रत्येकाच्या विरोधात तारांकित प्रश्न लावण्याचा सपाटा लावून आणि एकापाठोपाठ अनेक जणांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याने तसेच अविश्वास दाखल करण्याने ते कोणता विकास करीत आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

बातमी शेअर करा
Previous Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

Next Post
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add