Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

team by team
August 24, 2026
in शैक्षणिक
0
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

नंदुरबार l प्रतिनिधी-

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील बदल आणि संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा देण्यासाठी नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यशवंत विद्यालय, नंदुरबार येथे झालेल्या कौन्सिल सदस्यांच्या बैठकीत पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील यांची तर सचिवपदी चंद्रकांत पाटील तर प्रवक्तापदी दिनेश साळुंखे यांची निवड करण्यात आली.

 

 

बैठकीला संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस माजी विभागीय अध्यक्ष सुनील भामरे (नवापूर), सल्लागार निमेष सूर्यवंशी (तळोदा) व जयदेव पाटील (शहादा) यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संघाच्या आगामी वाटचालीसह विविध शैक्षणिक व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुकेश पाटील, सुनील भामरे, कुंदन पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापक अंबालाल पाटील, दिनेश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. चर्चेनंतर जिल्ह्यातील सर्व कौन्सिल सदस्यांच्या सहमतीने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

 

नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी (नंदुरबार), कार्याध्यक्ष कुंदन पाटील, सचिवपदी चंद्रकांत पाटील (शहादा) यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विनय गावित, अंबालाल पाटील (नवापूर), फैयाज खान, मनोहर साळुंखे (नंदुरबार), रफिक जहागीरदार (अक्कलकुवा), कालिदास पाठक (धडगाव), जगदीश पाटील, किरण पाटील (शहादा), योगेश पाटील (तळोदा) यांची निवड झाली. सहसचिवपदी निंबा माळी (नंदुरबार), विद्या सचिवपदी सुधाकर सैंदाणे (शहादा), सहविद्या सचिवपदी अजीम शेख (नवापूर), कोषाध्यक्षपदी संजय कुमार जाधव (नवापूर), सहकोषाध्यक्षपदी राकेश जोशी (शहादा), संपादकपदी सुनील परदेशी (तळोदा), ऑडिटरपदी दिनेश बिरारीस (नवापूर), सहसंपादकपदी सुभाष राहसे (धडगाव), तर महिला प्रतिनिधीपदी संध्या पटेल यांची निवड करण्यात आली.

 

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासह शैक्षणिक क्षेत्रातील बदलांशी समन्वय साधत संघाची वाटचाल पुढे नेण्याचा निर्धार यावेळी नवनियुक्त अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी व कार्यकारिणीने व्यक्त केला. बैठकीस जिल्ह्यातील सर्व कौन्सिलर सदस्य उपस्थित होते. पुष्पेंद्र रघुवंशी यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

Next Post

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

Next Post
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add