Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

team by team
June 28, 2026
in शैक्षणिक
0
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का.वी.प्र. संस्था संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती समता दिन म्हणून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय, समता, बहुजन कल्याण तसेच वंचित व मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या समतावादी विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी व समाजाने आत्मसात करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमास प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ए. एस. पाटील यांनी केले.

यावेळी उपस्थितांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या समतेच्या, शिक्षणाच्या व सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा दिला. “समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीतच खऱ्या विकासाचा मार्ग आहे,” हा शाहू महाराजांचा विचार आजही समाजाला समता, प्रगती आणि लोककल्याणाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ असल्याचे उपस्थितांनी अधोरेखित केले.

बातमी शेअर करा
Previous Post

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

Next Post
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add