Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

team by team
June 12, 2026
in क्राईम
0
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

नंदुरबार l प्रतिनिधी-

सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा विविध बँक खात्यांमधून वळविण्यासाठी नागरिकांच्या नावावर खाती उघडून त्यांची पासबुक व एटीएम किट वापरणाऱ्या टोळीचा नंदुरबार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेबाहेर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सायबर सेलचे पोलीस शिपाई पवन पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी रेहान बागवान, शाकीर खाटीक, अहमद फकीर, सागर ठाकरे, कौसेन मेमन व नदीम सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून नदीम सय्यद हा फरार आहे.

प्राथमिक तपासात आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून नागरिकांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्या नावाने बँक खाती उघडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संबंधित खात्यांची पासबुक, एटीएम किट व अन्य कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणूक आणि इतर गुन्हेगारी व्यवहारांमध्ये केला जात होता. सायबर गुन्ह्यांतून मिळालेली रक्कम या तथाकथित ‘म्युल अकाऊंट’च्या माध्यमातून विविध खात्यांमध्ये वळविली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच मोबाईल, चार पासबुक, दोन एटीएम किट, इंडियन पोस्ट पेमेंट कार्ड, दोन दुचाकी, लोखंडी फायटरसह एकूण १५ वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत ४० हजार ५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सायबर सेलच्या तपासात सागर ठाकरे व अहमद फकीर यांनी उघडलेल्या खात्यांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत रेहान बागवान, शाकीर खाटीक, कौसेन मेमन व नदीम सय्यद यांची भूमिका समोर आली. आरोपी नागरिकांची वैयक्तिक माहिती व बँकिंग सुविधा वापरून आर्थिक व्यवहारांचे जाळे उभे करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या प्रकरणामागे मोठे सायबर रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नसून, जप्त मोबाईल आणि बँक खात्यांच्या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. या माध्यमातून राज्याबाहेरील किंवा आंतरराज्यीय सायबर टोळीचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

‘म्युल अकाऊंट’ म्हणजे काय?

सायबर गुन्हेगार फसवणुकीतून मिळालेली रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता इतर व्यक्तींच्या नावाने उघडलेल्या खात्यांमधून फिरवतात. अशा खात्यांना ‘म्युल अकाऊंट’ म्हटले जाते. अनेकदा काही रकमेचे आमिष दाखवून नागरिकांची खाती वापरली जातात. अशा व्यवहारांत सहभागी झालेल्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

Next Post

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

Next Post
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add