Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

team by team
April 26, 2026
in राजकीय
0
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार तथा सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची प्रकृती आता वेगाने सुधारत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार डॉ.गावित यांची भेट घेतली.

आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत दोन महिन्यांपूर्वी हृदयविकारामळे बिघाड झाला होता. त्यावरील उपचार चालू असल्यामुळे मुंबई येथील रुग्णालयात दोन महिन्यांपासून दाखल आहेत. पूर्वीपेक्षा आता वेगाने प्रकृतीत सुधार होत असून सर्व प्रकारच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे व्हिडिओ कॉल द्वारे त्यांची भेट घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांशी त्यांनी संवाद सुरू केला आहे. संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या माध्यमातून जिल्हाभरातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद घडताना दिसत आहे. विविध बैठक मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सूचना करणे सुरू केले आहे. अनेक प्रमुख पदाधिकारी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू लागले आहेत. परिणामी डॉक्टर गावित समर्थकांच्या वर्तुळात एक नवा उत्साह संचारलेला दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. विचारपूस करून काही मुद्द्यांवर चर्चा केली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ कुमुदिनी गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित उपस्थित होते. याच्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह मान्यवर नेते तब्येतीची विचारणा करण्यासाठी रुग्णालयात येऊन गेले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

Next Post

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add