नंदुरबार | प्रतिनिधी
आज रोजी जिल्हा परिषदेच्या कोळदा व खपर गटासाठी आ.डॉ.विजयकुमार गावीत यांची कन्या डॉ.सुप्रिया गावीत व शिवसेनेचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपूत्र ऍड.राम रघुवंशी यांनी कोपर्ली गटातून नामांकन दाखल केले.
नंदुरबार तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११ गटांची पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. यात कालपर्यंत एकही उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातून आ.डॉ.विजयकुमार गावीत यांची द्वितीय कन्या तथा खा.डॉ.हिना गावीत यांची लहान बहिण डॉ.सुप्रिया गावीत या कोळदे गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून राजकारणात येणार असल्याचे वृत्त दिले होते. हे वृत्त खरे ठरले असून कोळदे (ता.नंदुरबार) गटातून त्यांनी आज भाजपातर्फे दोन नामनिर्देशपत्र दाखल केले. यावेळी त्यांचे सुचक म्हणून गिरधर शंकर पटेल व करण रमण भिल हे होते. नंदुरबार येथील तहसिल कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, माजी जि.प.अध्यक्षा डॉ.कुमूदिनी गावीत आदी उपस्थित होते. तसेच डॉ.सुप्रिया गावीत यांनी खापर गटातुनही नामनिर्देशपत्र दाखल केले दाखल केली.त्या नेमक्या कोणत्या गटातुन लढतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातुन त्यांनी राजकीय एन्ट्री झाली हे मात्र निश्चीत
दरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपूत्र ऍड.राम रघुवंशी या जिल्हा परिषदेच्या कोपर्ली (ता.नंदुरबार) गटातून निवडून आले होते. मात्र न्यायालयाचा निकालानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. आज दि. ३ जुलै रोजी त्यांनी कोपर्ली गटातून शिवसेनेतर्फे दोन अर्ज दाखल केले. त्यांचे सुचक म्हणून दिपक पंढरीनाथ पाटील व प्रमोद वालजी बारी हे उपस्थित होते.