नंदुरबार ! प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मोठं महत्त्व असतं. स्थानिक निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यामुळे त्यांना निवडणुका लढवण्याची संधी उपलब्ध होत असते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सर्वच जागा लढवणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष, माजी आ.अनिल गोटे यांनी दिली. उमेदवार प्रदेश पातळीवरून ठरविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी आज शनिवारी सेंट मदर टेरेसा स्कूलमध्ये करण्यात आली. त्याप्रसंगी माजी आ.गोटे उमेदवारांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत दिलीपराव मोरे यांनी निवडणुकीच्या आढावा मांडला. निरीक्षक नाना महाले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी,मोहन शेवाळे, इंजि.बी के पाडवी,अलिम मक्राणी,कार्याध्यक्ष सागर तांबोळी,युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा,नगरसेवक दानीश पठान, ॲड. राऊ मोरे, नंदुरबार विधानसभा क्षेत्र प्रभारी रवींद्र पाटील,अक्कलकुवा-धडगाव विधानसभा क्षेत्र प्रभारी संगिता पाडवी,नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील,शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रायसिंग वळवी,सोनवदचे सरपंच राजु वाघ,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप,अमृत चौधरी,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,राणुमल जैन,करीम बलोच, ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील,सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,कलाक्षेत्र जिल्हाध्यक्ष राजु पाटील,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे,महेंद्र कुवर,पंकज पाटील,जितेंद्र कोकणी,विनोद अहीरे,रविंद्र ठाकरे,राजा ठाकरे,छोटु कुवर,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवारांची आज शनिवारी चाचपणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ११ गट व पंचायत समितीसाठी १४ गणांसाठी इच्छुक उमेदवार सकाळ पासूनच दाखल झाले होते. जिल्हा प्रभारी अनिल गोटे, निरीक्षक नाना महाले, जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांनी उमेदवारांची चाचपणी केली. प्रत्येक जागेतून १ किंवा जास्तीत जास्त ३ उमेदवारांचे प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे सादर झाल्यानंतर उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत.