नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेअंतर्गत संचलित द फ्युचर स्टेप स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजेजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. प्रारंभी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी गांधी व शास्त्री यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. विद्यार्थी प्रितम मराठे याने महात्मा गांधींची वेशभूषा करून साकारलेली भूमिका विशेष आकर्षण ठरली. तसेच स्वच्छतेचा संदेश देणारा देखावा सादर करून ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ हा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास एम. आर. पाटील व एम. बी. अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन उमेश सोनवणे यांनी केले. उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, स्वच्छतेची जाणीव, सामाजिक बांधिलकी व नैतिक मूल्यांची रुजवण करण्याचा संदेश देण्यात आला.











