नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील शनिमांडळ येथे भाजपला खिंडार पडलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.शनिमांडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाचे उपतालुकाप्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे.
शिवसेना भवन,आमदार कार्यालयात शनिमांडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अरविंद मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाचे उपतालुकाप्रमुख सुनील पवार यांच्यासह अनिल राजपूत,संतोष धनगर,खंडू पाटील,किरण माळी, संजय पाटील,गोविंदा पाटील,अशोक कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींनी स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील,शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुश पाटील,शेतकरी संघाचे माजी संचालक रोहिदास राठोड, प्रा.चतुर सावंत,बाजार समिती संचालक ठाणसिंग राजपूत,ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे,संजय पाटील,छोटू पाटील,मधुकर पाटील,जितेंद्र पवार,सुनील गिरासे,राकेश राजपूत,संतोष धनगर,सुधीर पाटील आदी उपस्थित होते.








