नंदुरबार l प्रतिनिधी-
भाजपातील दमदार पुनरागमनानंतर महासंसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचे नंदुरबार तालुक्याच्या विविध गटातील समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतशबाजी करीत भव्य असे स्वागत आणि सत्कार केला. नंदुरबार शहरातील तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांकडून डॉक्टर हिना गावित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार तथा धडाडीच्या युवा नेत्या महा संसद रत्न डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टीत पुनश्च प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला. या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रचंड उत्साह संचारला असून नंदुरबार जिल्हा भाजपाची संघटन शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, त्या प्रवेश सोहळ्यानंतर नंदुरबार येथील निवासस्थानी नंदुरबार तालुक्यातील भाजपाच्या समस्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन जल्लोष केला. त्याप्रसंगी माझी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित उपस्थित होत्या. काही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. नंदुरबार तालुक्यातील विविध गटातून समूहाने आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देत डॉक्टर हिना गावित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. डॉक्टर हिना गावित यांचे स्वागत आणि सत्कार करणाऱ्यांमध्ये भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील माजी भाजपा तालुका अध्यक्ष सोमू गिरासे माजी सरपंच लोटन पाटील माजी सरपंच सचिन धनगर माजी उपसरपंच डॉ मनोज गिरासे माजी उपसरपंच व्यंकट पाटील सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील भाजपा ज्येष्ठ नेते बापू पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल पाटील गुलाब पाटील भाऊसाहेब पाटील विठोबा माळी आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समावेश आहे.








