नंदुरबार l प्रतिनिधी-
समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळा या ठिकाणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या अधिवेशनात समाजहिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले. सर्वप्रथम माँ अन्नपूर्णा, स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली. समाजातील मृत झालेल्या समाजबांधव तसेच देशपातळीवर थोर दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गुजर समाजाचे भाट दादा बडोदा येथील रोहितभाई बारोट यांचे समाजाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील, जयश्रीबेन उर्फ कांचनबेन पाटील, माधवीताई पाटील, मंगलाबेन चौधरी, उपाध्यक्ष सुनील पटेल, जगदीश पाटील, माधव पाटील, रविंद्र गुजर, दिलीप पटेल, सुनील पाटील, महेंद्रभाई पाटील, दीपकनाथ पाटील, डॉ सतीश चौधरी, अडवोकेट गोविंदभाई पाटील, सुभाष पाटील, डॉ लतेश चौधरी, राकेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी समाजाचे जनरल सेक्रेटरी सुनील पाटील यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले व जमा झालेल्या खर्चाचे वाचन केले. यावेळी इंदिरा पाटील (विद्याविहार), अर्चना पाटील (शहादा), जगदीशभाई पटेल (निझर), अनामिका पाटील (शहादा), गणेशभाई पाटील (पाडळदा), रविंद्र पाटील (शिंदे), जयप्रकाश पाटील (मामा मोहिदा), डॉ प्रफुल्ल पाटील (शिवपूर), भाट दादा रोहितभाई बारोट, मीनाक्षी पटेल (धुळे) आदीनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाला “सरदार सेतू” हे नाव देण्यात यावे असा ठराव करण्यात आला तसेच समाजात ज्या मुली-मुले पळून जाऊन लग्न करतात त्यांची विवाह नोंदणी आई वडिलांच्या संमती शिवाय होऊ नये तसेच विवाह नोंदणी शक्यतो ते रहिवासी असलेल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यातच व्हावी असा ठराव करुन तो राज्य व केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा असे ठरले. विविध क्षेत्रात यश व प्राविण्य संपादन केलेल्या समाजातील युवक युवती यांचा समाजाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यात कु. हिना अंबालाल चौधरी रा.गुजर खर्दे ता.शिरपूर (विद्यापीठ गुणवत्ता यादीत समावेश, गोल्ड मेडल प्राप्त – मास्टर ऑफ फार्मसी), कु. नयन अनिलभाई पटेल रा. निझर, ह.मु. अहमदाबाद (सीए परीक्षा उत्तीर्ण), कु.आर्यन मेहुल पटेल रा.वेळदा (सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू कब्बडी गोल्ड मेडल), डॉ शांतीलाल शिवदास पटेल, रा.रायखेड, ह.मु. गणेशपुरी, भिलुडा, डुंगरपूर, राजस्थान (राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक कार्यासाठी पुरस्कार प्राप्त), कु.सिद्धी अंबालाल उर्फ आनंद पटेल, रा.राकासवाडा (कराटे क्रीडा मध्ये राज्यस्तरीय ब्लैक बेल्ट मध्ये गोल्ड मेडल तसेच कराटे परीक्षक आणि जज नियुक्ती), कु.माही योगेश पाटील रा.लांबोळा ह.मु. मकरपूरा, बडोदा राष्ट्रीय पातळीवर शिमला हिमाचल प्रदेश येथे क्लासिकल भरतनाट्यम सोलो नृत्य प्रकारात तिसरा क्रमांक), कु.गाल्वी प्रशांत पाटील रा. सुलवाडा (जापान येथे जम्प रोप स्पर्धेत सहभाग), कु. रुद्र महेंद्र पाटील, रा.पाडळदा (१४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत विभागीय स्तरावर विजय आणि राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड), कु.रुद्र रवींद्र पाटील रा.करजकुपा, ह.मु.नंदुरबार (जेईई मेन्स आणि जेईई एडवांस मध्ये प्रावीण्य मिळवून आयआयटी दिल्ली येथे बी.टेक मध्ये प्रवेश), कु.कृष्णा महेश्वर पाटील, रा.दामळदा, ह.मु. व्यारा (रायफल शूटिंग मध्ये नॅशनल गोल्ड मेडल्सिट), कु.ध्रुवंश राहुल पाटील तळवे, ह.मु.पुणे (५ वर्ष आतील स्पीड स्केटिंग मध्ये ब्राँझ मेडल तसेच यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, यू-एन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि जीनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद), कु. वेदांत योगेश पटेल, वेळदा (१७ वर्ष आतील हँडबाल इंटरनॅशनल चैम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारतीय संघात निवड व सहभाग), कु.तेजस सोमनाथभाई पटेल, रा.वेळदा, (१७ वर्ष आतील हँडबाल इंटरनॅशनल चैम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारतीय संघात निवड व सहभाग), कु.ओम प्रशांत पाटील, रा. गुजरभवाली, ह.मु. नंदुरबार (ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट चैम्पियनशिप तर्फे आयोजित नॅशनल लेवल चैम्पियनशिप साठी महाराष्ट्र संघात सहभाग व निवड), कु.प्राची लक्ष्मण चौधरी, धुरखेडा, ह.मु.कागजनगर, तेलंगाना (नीट एमडीएस परीक्षेत प्रावीण्य), कु.श्रीतेश भूपेंद्र पटेल, रा.काथर्दा. ह.मु.धुळे (यूपीएससी परीक्षेत प्रावीण्य), समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था प्रकाशा ता.शहादा येथील दत्तूभाई (तुंबाभाई) मगन पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला. सामूहिक सत्कारार्थी कु.मेहुल संजय पाटील, कु.मनन सुरेश पाटील, कु.वेदांत रमाकांत पाटील, कु.पियुष बाळकृष्ण पटेल, डॉ सुरभी प्रविण पाटील, डॉ आदित्य अतुलभाई पाटील, डॉ सुहास अंबालाल पाटील, कु.गौरव महेंद्र पटेल, डॉ शुभम अंबालाल चौधरी यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. तसेच जय सरदार पटेल फाउंडेशन, शहादा यांनी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्ताने एकता रॅलीचे उत्कृष्ट आयोजन करीत समाजाला एकजूट केले त्याबद्दल त्यांचा समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वार्षिक अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी सांगितले की, समाजबांधवानी संघटित राहावे यासाठी प्रयत्न करावेत तसेच समाज कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करावेत. समाजात समानता ठेवले पाहिजे, समानता ठेवली तर सगळ्यांचे कल्याण होईल. स्व. अण्णासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन समाज कार्य करावे असे सांगितले होते. गुजर समाज हा शेतीप्रधान समाज आहे.
समाजातील संघटन बळकट करून शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली द्याव्यात. समाजातील तरुण मुला-मुलींनी आधुनिक युगात विविध क्षेत्रात कार्य करावे. समाजाने केलेले नियम हे सर्वांनी काटेकोरपणे पाळले पाहिजे. समाजहितासाठी राजकारण न करता कोण कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा समाजाच्या सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. प्रत्येकाने जगले पाहिजे आणि हित जोपासले पाहिजे.
माणसाकडून चुका होत असतात आणि त्या चुका माणसाने दुरुस्त करून किवा भविष्यात त्या चुका न करता कार्य केले पाहिजे. समाजाला एकजूट करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कार्य केले पाहिजे. यावेळी समाजातील नागरिकांनी समाजासाठी तसेच सद्गुरू धर्मशाळा साठी दान दात्यानी देणग्या जाहीर केल्या. या अधिवेशनात सुनिल पटेल, जगदीश पाटील, अभिजीत पाटील, राकेश पाटील, शितल पटेल, मोहन चौधरी, माधव पाटील, सुनील पाटील, दीपकनाथ पाटील, जगदीश पटेल, हरी दत्तू पाटील, रामचंद्र दशरथ पाटील, डॉ सतीश चौधरी, गोविंद पाटील, मोहन पटेल, रविंद्र गुजर, सुभाष पटेल, शिवदास चौधरी, रमाकांतभाई पाटील, किशोर पटेल, मंगलाबेन चौधरी, जयप्रकाश पाटील, के. डी. पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल, भरत पाटील, कृष्णदास पटेल, दत्तू पटेल, शिवदास चौधरी, दशरथ पाटील, डॉ लतेश चौधरी, डॉ प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.
या वार्षिक अधिवेशनात आलेल्या सर्व समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था प्रकाशा ता.शहादा येथील दत्तूभाई (तुंबाभाई) मगन पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. तर पुढील वर्षासाठी जेवणाची व्यवस्था लहान शहादा येथील राजेंद्र सुदाम पाटील रा.लहान शहादा यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. यावेळी समाजाच्या वार्षिक अधिवेशनात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. अधिवेशनाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. अधिवेशनाचे सूत्रसंचालन व आभार सुनील पाटील यांनी केले.








