Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

team by team
June 3, 2025
in क्राईम
0
मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी-

अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पथकाने अटक केली आहे.त्यांच्या ताब्यातून 74 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.

 

 

 

दि. 01 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत गुप्त माहिती मिळाली की, नंदुरबार शहरात सोनार गल्ली परिसरात दोन संशयित इसम हे त्यांच्या ताब्यातील पिशवीत काहीतरी दागिने कमी दरात विक्री करण्याचे उद्देशाने फिरत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्था.गु.शा. पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार सोनार गल्ली परिसरात येऊन शोध घेतला असता दोन इसम हे सोनार गल्लीत सोनार खुंट परिसरात प्लास्टीकचे पिशवीसह उभे असल्याचे दिसुन आले. स्था.गु.शा. पथकाने त्यांचेजवळ जाऊन विचारपुस करता त्यांनी त्यांचे नाव यासिन रईस मक्राणी, रा. आमलीबारी फाटा, अक्कलकुवा, जि. नंदुरबार, मुस्तकीम खान अब्दुल शकुर मक्राणी रा. इंदिरा नगर, अक्कलकुवा, जि. नंदुरबार असे सांगितले.

त्यांना त्यांच्या ताब्यातील पिशवीत काय आहे बाबत विचारण करता ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने स्था.गु.शा. पथकास त्यांच्यावर अधिकचा संशय बळावल्याने त्यांचे ताब्यातील पिशवीची झडती घेता त्यात पांढऱ्या धातुचे दागिने दिसुन आले. सदर दागिने हे चोरीचे असल्याचे दाट संशय आल्याने स्था.गु.शा. पथकाने दोन्ही इसमांना अधिकचे विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी ते दागिने काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान एका ठिकाणी महिला झोपलेल्या अवस्थेत असतांना तिचे अंगावरुन काढून घेतले असल्याची माहिती दिली. त्याअनुषंगाने स्था.गु.शा. पथकाने

मोलगी पोलीस ठाणे येथे सदर बाबत माहिती घेऊन खात्री केली असता मोलगी पोलीस ठाणे येथे वरील हकिगतप्रमाणे भा. न्या. संहिता कलम 303(2), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले.

तरी सदर इसमांकडून एकुण 74 हजार 400 रुपये किमतीचे 800 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करुन मोलगी पोलीस ठाणे गु.र.नं. 76/2025 हा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश मिळाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ मुकेश तावडे, मनोज नाईक, विशाल नागरे, राकेश मोरे, पोना मोहन ढमढेरे, पोकों अभय राजपुत, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण अशांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

Next Post

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Next Post
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add