Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

team by team
June 3, 2025
in राज्य
0
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी-

मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसीय सहज आणि सोप्या जीवशैली (ईज ऑफ लिव्हिंग) उपक्रमांतर्गत सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आता या प्रकल्पांतर्गत होणाऱ्या सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या अंतर्गत मुख्यतः अक्कलकुवा, धडगाव आणि तळोदा या तीन दुर्गम तालुक्यांतील प्रकल्पग्रस्तांना आता सुनावणीसाठी 80 ते 90 किलोमीटरचा प्रवास करण्याची आवश्यकता भासणार नाही. या भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, वाहतुकीच्या साधनांचा अभाव आणि वेळेचा अपव्यय लक्षात घेता ऑनलाईन सुनावणीची सुविधा ही त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

या नवीन सुविधेमुळे दावेदारांना आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयातच ऑनलाईन सुनावणीत सहभागी होता येणार आहे. सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे सादर करता येतील. सुनावणी दरम्यान दावेदारांच्या स्वाक्षऱ्या किंवा अंगठ्यांचे नमुने स्वतंत्र कागदावर घेऊन त्याच दिवशी संबंधित कागदपत्रांसह अपर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक दावेदारास तहसील कार्यालयामार्फत रीतसर नोटीस बजावण्यात येईल व तहसील कार्यालयातच ऑनलाईन सुनावणीसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या सोयीसाठी व प्रशासनाच्या जवळीकासाठी उचललेले हे पाऊल या ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेला योग्य न्याय देणारे ठरणार आहे, असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

Next Post

चारित्र्याच्या संशय घेत पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला, महिला जखमी

Next Post
चारित्र्याच्या संशय घेत पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला, महिला जखमी

चारित्र्याच्या संशय घेत पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला, महिला जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add