नंदुरबार l प्रतिनिधी-
तांत्रिक कारणास्तव रेशन दुकानावर पॉस मशीन बंद पडल्यास रेशन दुकानदार यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी केले.
अन्न व नागरी पुरवठा विभागातील आधारबेस सार्वजनिक वितरण व्यवस्था (AePDS) व रेशन कार्ड व्यवस्थापन (RCMS) प्रणालीचे क्लाऊड हस्तांतरणाची कार्यवाही सुरू असल्याने सदर प्रणालीवर कामकाज करतांना तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता असल्याबाबत सर्व रेशन दुकानदार यांना यापुर्वीच अवगत करण्यात आलेले आहे. त्यानुसार ते लाभार्थी यांना सदर बाब अवगत करून अडचण निराकरण (Crisis Management) करण्याचे काम करत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागातील प्रणाली हस्तांतरणामध्ये कार्यरत असलेले एनआयसी-NIC भुवनेश्वर,दिल्ली, हैद्राबाद व महाराष्ट्र राज्य NIC, खाजगी क्लाऊड सेवा पुरवठादार या सर्वांसोबत समन्वय करून शासनस्तरावरून युद्धपातळीवर ही पाॅस मशिन बंद पडण्याची समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे.
या दरम्यानच्या कालावधीमध्ये आधार प्रणालीमुळे सर्व देशभरात बायोमॅट्रिक पडताळणी करतांना समस्या येत आहे. थोडया काळासाठी ई-पॉस मशिन बंद झाल्यास याबाबत लाभार्थी नागरिकांनी संयम ठेवून रेशन दुकानदार यांना सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी केले.