Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे : डॉ. विजयकुमार गावित

team by team
September 19, 2024
in राजकीय
0
‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत चालू राहणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ या जन आंदोलनासाठी सर्वांनी पूर्ण, निष्ठापूर्वक समर्पण करण्याची शपथ, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

त्यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने शिवण नदी पात्रात आयोजित स्वच्छता ही सेवा पंधरवडा च्या शुभारंभ प्रसंगी शपथ देताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले, प्रत्येकाने अंतकरणातून हा दृढ संकल्प करून, स्वतःला एक स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी स्वच्छता ही सेवा’ या जन आंदोलनासाठी सर्वांनी पूर्ण, निष्ठापूर्वक समर्पण करावे. यात प्रत्येकाने आपले घर, विद्यालय, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे आणि बस स्टेशन, तलाव आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

तसेच स्वतः शिवाय इतर लोकांना, जे स्वतःची स्वच्छता संबंधित व्यवस्था करण्यात असमर्थ आहेत त्यांना दोन खड्डयाच्या शौचालयाच्या निर्मितीसाठी मदत करून गाव, वाडया, वस्ती यांना हागणदारीमुक्त करण्यासाठी संपूर्ण योगदान द्यायला हवे. शौचालयाचा वापर, हात धुण्याची सवय आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारुन स्वच्छताविषयक सवयींमध्ये वर्तनबदल करण्यात सहभागी व्हावे. सांडपाणी आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कमी करणे, पुनर्रप्रक्रिया आणि पुनर्रउपयोग या सिद्धांताचा स्वतः अंगीकार करून इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

यावेळी शिवण नदी पात्रात गणपती विसर्जनामुळे झालेल्या निर्माल्याची स्वच्छता करण्यात आली यात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार विविध यंत्रणांचे प्रमुख,अधिकारी व पदाधिकारी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

विसरवाडी येथे 18 महिला बचत गटांना मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेळी गटांचे वितरण

Next Post

प्रा. डी.सी.पाटील यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी निवड

Next Post
प्रा. डी.सी.पाटील यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी निवड

प्रा. डी.सी.पाटील यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add