Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडी येथे 18 महिला बचत गटांना मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेळी गटांचे वितरण

team by team
September 19, 2024
in राजकीय
0
विसरवाडी येथे 18 महिला बचत गटांना मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेळी गटांचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निवड झालेल्या महिला 18 बचत गटांना शेळी गट वितरणाचा कार्यक्रम आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमास नवापूर चे माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषद सदस्य सुनिल गावित, नवापूर पं.स.चे माजी सभापती विनायक गावित, संदिप अग्रवाल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, प्रकाश वसावे, शिक्षण विकास अधिकारी ज्ञानेश्वर माळी, विजय सोनार यांच्यासह बचत गटांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येंन उपस्थित होते.

आदिवासी समुदायातील लोक हे प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्याने त्यांच्याकडील जमीन उंचसखल, डोंगराळ हलक्या प्रतीची खडकाळ स्वरूपाची असते, त्या जमीनीत येणारे उत्पन्नाचे प्रमाण कमी असते, योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो. परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुंटूंबासह स्थलांतर करावे लागते. बचत गटांना शेळी गट वितरण योजनेअंतर्गत शेतीस पुरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी दहा शेळ्या व एक बोकड पुरविल्यास शेतकऱ्यांच्या कुटूंबांना आर्थिक फायदा होईल व त्यांचे होणारे स्थलांतराचे प्रमाण काही अंशी कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल, हा योजना राबविण्याचा मुख्य उददेश असल्याचे यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. तसेच त्यांनी जिल्हा विकासासाठी ज्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे त्याबाबतही उपस्थितींना माहिती दिली.

यावेळी माजी आमदार शरद गावित यांनीही मनोगत व्यक्त केले. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी गट पुरवठा करण्याची योजना मंजूर होती. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रती महिला बचत गट रूपये. 1 लाख 3,545 प्रमाणे मंजूर आहेत. नंदुरबार प्रकल्प कार्यालयासाठी 129 चा लक्षांक निश्चित करून देण्यात आला. त्यानुसार नंदुरबार-12 गट, नवापूर-103 गटांचा उद्दिष्ट असल्याचे नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यात कासव विक्री करणारे दोघे दोन कासवांसह वनविभागाच्या ताब्यात; 18 सप्टेंबरपर्यंत वनकोठडी

Next Post

‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे : डॉ. विजयकुमार गावित

‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add