नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील अंधारे चौकात असलेल्या विद्यासरोज हॉस्पिटलच्या रुग्णसेवेमुळे अल्पावधीतच नावलौकीक झाले. त्यामुळेच विविध नागरिकांची मागणी लक्षात घेता श्री.विद्यासरोज हॉस्पिटलच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ 15 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या नवीन रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सोयी सुविधा असून रुग्ण तसेच नातेवाईकांचे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.
2021 च्या डिसेंबर 27 ला नंदनगरीत अंधारे चौकात आपल्याच साक्षीने विद्यासरोज हॉस्पिटलची मुहुर्तमेढ झाली आणि हा हा म्हणता, हे रोपटे तीन वर्षांचे होऊन आता चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे.विद्यासरोज हॉस्पिटल’ आज उच्च दर्जाच्या अप्रतिम रुग्णसेवेबाबत नंदनगरीच्या लौकिकात भर घालीत आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेता.
श्री.विद्यासरोज हॉस्पिटलच्या अद्ययावत विस्तारीत शाखेचे तळोदा रोडवरील सी.बी.पेट्रोल पंपाजवळ 15 सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार आहे. रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी शुभ मुहूर्तावर सत्यनारायण महापुजा व अल्पोपहार आयोजित करण्यात आला आहे.
यांना नवीन वास्तूची विशेष वैशिष्ट्य म्हणजे भव्य असे रुग्णालय बनवले असून. सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबत रुग्णासोबत येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे या रुग्णालयात विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. वेगवेगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
15 सप्टेंबर रोजी श्री. विद्यासरोज हॉस्पिटल, सी.बी. पेट्रोल पंपासमोर, जिजामाता कॉलेज रोड, नंदुरबार 425412 फोन:- 02564-228888, मोबाईल 7071-586-586 वेळ : दुपारी 1.00 ते आपल्या आगमनापर्यत येण्याचे आवाहन डॉ. गौरव अशोक तांबोळी, डॉ. स्वप्निल मधुकर महाजन यांनी केले आहे.