नंदुरबार l प्रतिनिधी
घोषणाबाजी केल्यावर आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्याने पक्ष वाढत नसतो. त्यासाठी शिवसैनिकांनी जनतेत जाऊन त्यांची कामे करावीत. जोपर्यंत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या झेंडा फडकत नाही तोपर्यंत शिवसैनिकांनी शांत बसू नये असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गेले.
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या देवगोई (डाब) येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मेळावा आणि शिवदूतांचे संमेलन रविवारी घेण्यात आले. त्याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश हिरे यांनी यावेळी जि.प सदस्य विजय पराडके, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी मनोगत व्यक्त करीत पक्षाची भूमिका मांडली.
प्रसंगी माजी आमदार रघुवंशी म्हणाले, शिवदूतांच्या कार्यामुळेच शिवसेना वाढणार आहे घोषणाबाजी केल्यावर आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्याने पक्ष वाढणार नसून, शिवसेनिकांनी जनतेची कामे करावीत.अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचीचाच उमेदवार विजयी होईल. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी त्यांच्या गावातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडवाव्यात. शिवसैनिकांनी जनतेत राहून त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे.
कार्यक्रमात जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया वळवी, युवा सेना प्रमुख योगेश पाटील, पं.स उपसभापती भाईदास अत्रे, अक्कलकुवा तालुकाप्रमुख रायसिंग वळवी,पं.स माजी उपसभापती भाऊ राणा, पुरुषोत्तम पावरा, दिलीप पावरा यांच्यासह दुर्गम भागातील विविध गावातील सरपंच,उपसरपंच व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांचे आर्थिक उन्नती
यावेळी संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,सरकारी योजनांच्या लाभ लोकप्रतिनिधी देत नसतात ते शासन देते. काही लोकप्रतिनिधी आपणच योजनांच्या लाभ देत असल्याच्या गवगवा करीत आहेत. महिलांचे आर्थिक उन्नतीचे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण केले आहे.