नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करून जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ त्यामुळे भविष्यात रोजगारासाठी पर राज्यात जाणार नाही असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालयात आधुनिक सर्व सोईयुक्त दोन वर्ग खोल्याचे भूमिपूजन व कामगारांसाठी साहित्य वितरण प्रसंगी आदिवासी डॉ. विजयकुमार गावित बोलत होते.
यावेळी डॉ.गावित पुढे म्हणाले की, नंदुरबार तालुक्यातील आसाणे आणि निंभेल या ठिकाणी धरणांच्या उभारणीसाठीची निविदा येत्या १५ दिवसात प्रसिद्ध होणार असून त्यामुळे तापी नदिचे पाणी या धरणांमधून नंदुरबार शहरासह तालुक्याच्या शेती आणि पेयजलाची गरज भागविणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात पेव्हर ब्लॉकसह, रस्ते, गटारी यासारखी विकासकामे देण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही मागणीप्रमाणे ही कामे करण्यात येतील. कामगारांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर असून त्यांच्या दैनंदिन उपयोगच्या साहित्यासह त्यांना सामाजिक, वैदयकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमतेसाठी जे-जे शासन म्हणून कराता येईल ते केले जात आहे. येणाऱ्य काळात जिल्ह्यातील एकही कामगार शासनाच्या सुविधांपासून वंचित राहणार नाही, नदीचे पाणी शेतकऱ्यांसाठी आणू येत्या पाच वर्षात जिल्ह्यातील बेरोजगारी व तापी नदीचे पाणी आणून शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू तसेच जिल्ह्यात आतापर्यंत लाडकी बहन योजनेअंतर्ग त ८४ हजार महिलांना लाभ मिळाला आहे, यापुढे लाभ मिळवून देऊ असे डॉ.गावित म्हणाले.
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात मा. खासदार हिनाताई गावित यांच्या खासदार निधीतून दोन अद्यावत वर्ग खोल्यांसाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.त्याचे भूमिपूजन डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय बोरसे, शाना धनगर, हिम्मत पाटील, पी.पी. बागुल, माधवपुरी गोसावी रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते. यानंतर कामगार साहित्य वाटप नामदार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बाहेर परिसरातील नगाव,तीसी, शिंदगव्हाण, दहिदुले आदी गावातील तीनशे कामगार साहित्य व तीनशे संसार उपयोगी भांड्याचे वाटप करण्यात आले.