नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आदित्य मिलिंद पिंपळे याने शालेय क्रिडा स्पर्धेतील जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत १४ वर्षा आतील वयोगटात ५० मी. व १०० मी. फ्रीस्टाइल प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तर ५० मी. बॅक स्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक आला.
या स्पर्धेचे उद्घाटन जलतरण संघटनेचे अध्यक्ष किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयीन अधीक्षक व प्राचार्य पुष्पेंद्रजी रघुवंशी, निंबाळकर ,क्रीडा अधिकारी मुकेश बारी, अमोल भोयर, मयूर ठाकरे, विविध शाळांमधील क्रीडा शिक्षक व पालक याप्रसंगी उपस्थित होते.
नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, सरचिटणिस यशवंतराव पाटील, मुख्याध्यापक आर.एच.बागुल, पर्यवेक्षक व्ही.जे.पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी कौतुक केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील शिक्षक एन.जी.पाटील, क्रीडा शिक्षक ए.एस.शिंदे यांनी मार्गदर्शन केले.