नंदुरबार l प्रतिनिधी-
वात्सल्याची माऊली मॉं साहेब मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे उपजिल्हा प्रमुख अर्जुनतात्या मराठे यांच्या उपस्थितीत युवासेना पदाधिकारी शिवसैनिकांमार्फत अभिवादन करण्यात आले.
येथील जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण अर्पण करण्यात आले. यावेळी नंदुरबार तालुका प्रमुख रमेश पाटील म्हणाले की, तमाम शिवसैनिकांना मॉं साहेबांनी लेकराप्रमाणे आशिर्वाद देत मोठे केले. आपली आई याप्रमाणे आपल्या कुटूंबातील मुलामुलींमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता सेवा देत असते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही विभागाचा शिवसैनिक हा माझा लेकरु आहे, त्याला मोठे केले पाहीजे, असा आशिर्वाद मॉं साहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाला दिला.
या मॉं साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज रोजी रश्मी वहिणी तमाम शिवसैनिकांची काळजी घेत आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर पाटील, जिल्हा सोशल मिडीया समन्वयक आनंदा पाटील, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख राहुल कोळी, युवासेना जिल्हा सचिव दिनेशभाऊ कोळी, शहर संघटक भक्तवत्सल सोनार, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख छोटू चौधरी, युवासेना शहर अधिकारी दादाभाऊ कोळी, युवासेना शहर उपअधिकारी शेरा पठाण, युवासेना शहर संघटक धीरज घाटे, शहर समन्वयक अक्षर श्रीखंडे, तालुका गटप्रमुख अनिल पाटील, अय्यान खाटीक, सुदाम पाटील, दिनेश पाटील, कुणाल पाटील, सागर पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.