म्हसावद । प्रतिनिधी:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नंदुरबार जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या सहकार्याने तळोदा तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडीयम स्कुल आमलाड येथे आयोजित करण्यात आल्या.
स्पर्धेचे उदघाटन शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक सुनिल सूर्यवंशी व रामा हटकर हे होते.यावेळी उपस्थितांचे सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा संयोजक सुनिल सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक पुलायन जाधव,योगेश पाडवी उपस्थित होते.यात १४ वर्ष वयोगटात मुले शेठ के.डी. हायस्कुल तळोदा,१७ वर्ष वयोगटात विद्या गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल आमलाड,१९ वर्ष वयोगटात विद्या गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल आमलाड तसेच मुलीच्या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तऱ्हावड,१७ वर्ष वयोगटात
विद्या गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल आमलाड व १९ वर्ष वयोगटात विद्या गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल आमलाड यांनी यश संपादन केले.
त्यांची निवड होणाऱ्या जिल्हा स्पर्धेसेठी निवड करण्यात आली आहे. पंच म्हणून राम सूर्यवंशी. योगेश वळवी. यांनी काम पाहिले तर गुण लेखक म्हणून लक्ष्मण वसावे जे.सी. खरडे यांनी काम पाहिले.