Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाचे चारही आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात निवडून आणणार; डॉ. हिना गावित

team by team
July 13, 2024
in राजकीय
0
भाजपाचे चारही आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात निवडून आणणार; डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे पक्षांतर करतील, लवकरच भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देतील; या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या चर्चेला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावित यांनी पूर्णविराम दिला.

निवडणुकीत अपयश आले म्हणून मी घाबरून जाणारी नाही मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीतच राहणार आणि स्वतः मंत्री डॉ. विजयकुमार गावित हेच यंदाच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून येतील, अशा ठोस शब्दात डॉ. हिना गावित यांनी संकल्प मेळाव्यात जाहीर स्पष्टीकरण केले.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मंत्री डॉ.विजयकुमार गावित आणि डॉ.हिना गावित हे पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा पसरविण्यात आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत दिनांक 12 जुलै 2024 रोजी बाबा रिसॉर्ट च्या सभागृहात हा मेळावा पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.

विरोधकांचा समाचार घेताना डॉ.हिना गावित म्हणाल्या, संविधान धोक्यात असल्याचे खोटे समज पसरवून विरोधकांनी विजय मिळवला. परंतु जनमत आपल्यालाच अनुकूल असल्याचा गैरसमज करून आमचे काही विरोधक आपल्यामुळेच भाजपाचा पराभव झाल्याचे समजतात. आताही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हाताशी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत म्हणून जलजीवन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे खोटे सांगत सुटले आहेत. वास्तविक आज ओरड करणाऱ्या या विरोधकांच्या सत्ता काळातच जलजीवन योजनेच्या कामांची आखणी केली गेली चुकीचे सर्वे केले गेले. सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार बिल अदा झालेले असताना हे विरोधक काम पूर्ण नसताना बिल देण्यात आल्याचे खोटे सांगत आहेत हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. खोट्या गोष्टींचे भांडवल करून अफवा पसरवतात. आणि भाजपा सोडून जाणार ही पसरवण्यात आलेली अफवा त्यातलीच आहे, असे डॉ. हिना गावित म्हणाल्या. पूर्वीपेक्षाही जास्तीच्या मताधिक्याने डॉ.विजयकुमार गावित यांना सातव्यांदा निवडून आणून या; असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांनी आपल्या भाषणातून केले.

नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्यासह भाजपाचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर पाटील, श्याम मराठे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल, विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, प्रकाश गावित आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांसह बंजारा दल प्रमुख श्रावण चव्हाण, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अविनाश माळी, कोपर्ली सरपंच वानखेडे आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला खोडून काढण्यासाठी संघटितपणे पूर्वीपेक्षा ताकदीने काम करू आणि जास्तीत जास्त मताधिक्याने भाजपाचे उमेदवार निवडून आणू, असा संकल्प सर्व उपस्थित कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

Next Post

लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी गावागावात घेणार शिबिरे; संकल्प मेळाव्यात डॉ. हिना गावित यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add