नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील वाकीपाडा येथे दुचाकीची हवा काढल्याच्या रागातून मॉर्निंग वॉकला गेलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यावर मागून लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास येथे घडली . रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील वाकीपाडा ग्रामपंचायत सदस्य मधुदीप रविकांत ( वय ३१ ) हे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले असता मागून येणाऱ्या गावातील सॅमवन वळवी याने मोटारसायकलची हवा का काढली , याचा राग आल्याने काहीही न विचारता डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला . यात ग्रामपंचायत सदस्य मधुदीप वसावे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले . त्यांना तत्काळ उपचारासाठी नवापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्यांची प्रकृती आहे . त्यांच्या डोक्याला स्थिर चार टाके पडले आहेत . तसेच हातापायाला दुखापत माहिती उपजिल्हा रुग्णालयातील झाल्याची सूत्रांनी दिली . नवापूर पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पंचनामा केला . मधुदीप वसावे यांना घटनेची विचारपूस केली . ग्रामपंचायत सदस्य वसावे यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात नवापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल नवापूर पोलिस केली असून , गुन्हा दाखल करीत आहे . पुढील तपास नवापूर पोलिस करीत आहे . ग्रामपंचायत सदस्यावर झालेल्या हल्ल्याचा परिसरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे .