शहरातील देवळफळी भागातील शाळकरी विद्यार्थिनींचा भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकार्यांना गौरव केला.
शहरातील देवळफळी भागात असलेल्या तीन शाळकरी विद्यार्थिनींचे नंदुरबार जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.किन्नरी सोनार, महिला आघाडी मोर्चा जिल्हाउपाध्यक्षा व जि.प.सदस्या सौ.संगिता गावित, तालुकाध्यक्षा सौ.उज्वला वसावे, शहराध्यक्षा सौ.जिग्निशा राणा, माजी नगरसेविका श्रीमती सुनीता वसावे यांनी शहरातील देवळफळी भागातील कु.दिव्यानी विजय मावची (इयत्ता ४ थी), कु.मेघा भरत मावची (इयत्ता ४ थी) आणि कु.हर्षिता विजय मावची (इयत्ता ६ वी) यांना आदिंना दफ्तर, वह्या पेन्सिल, चॉकलेट, बिस्किटे पुडा व विविध खाद्यपदार्थ देउन त्यांचे पूजन केले. कु.दिव्यानी हिचा नवरात्रोत्सवाचा नऊ दिवसांचा उपवास असून ती अनवाणी अर्थात पायात चप्पल न घालता नवरात्रोत्सव साजरा करत आहे. हे ऐकून उपस्थित मान्यवरांनी तिचे कौतूक केले.
श्री.महेश शांताराम पाटील
9404747458
At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458