म्हसावद l प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार सीमावर्ती भागातील खेतिया (मध्येप्रदेश.) नगर परिषद सभागृहात सभा घेण्यात आली. सभेत अवैध धंदे व गैर कृत्यांवर िनर्बंध आणण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पानसेमलचे तहसीलदार सुनील सिसोदिया, शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, खेतीया पोलिस ठाण्याचे सुनीता मंडलोई, म्हसावदचे सहायक पोलीस निरीक्षक राजन मोरे, पानसेमलचे पोलिस निरीक्षक मंशाराम वागेन, खेतीयाचे पाेलिस उपनिरीक्षक चौहान आदी उपस्थित हाेते.
बैठकीत लोकसभा निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारची अवैध धंदे व गैर कृत्यांवर िनर्बंध आणण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. त्यात दारू, गुटखा, अंमली पदार्थ यासह मतदारांना आकर्षित करणे व त्यांना प्रलोभने दाखवण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तूंची वाहतूक होणार नाही यावरही चर्चा झाली.
याशिवाय फरार, आरोपी, समन्स-वॉरंट, एनबीडब्ल्यू, बीडब्ल्यू वॉरंट व एफएसटी, एसएसटी पथकांचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. दरम्यान सीमेवरील चेक नाक्यांच्या माध्यमातून समन्वय साधत योग्य नयाेजन व्हावे, या िनयाेजनातूनच लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात येणार असल्याचे यावेळी संगण्यात आले.