नंदुरबार | प्रतिनिधी
शहर आणि जिल्ह्यात नवरात्र उत्सवानिमित्त नंदुरबार शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, खोडाई माता मंदिर येथील वर्दळीच्या परिसरात घातपात विरोध पथकातर्फे तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित डांगरे यांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने भेट देऊन नंदुरबार बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि खोडाईमाता मंदिर परिसरात तपासणी अभियान राबविले. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोह. गुलाब वळवी, नीलकंठ भामरे, पोना राजेंद्रकुमार गावित, सुनीलकुमार सूर्यवंशी, पोकॉ मयूर माळी, अमोल देशमुख, सहभागी झाले होते. जिल्हा पोलिस दलातील प्रशिक्षित श्वान ब्राऊनी यांच्या साह्याने वर्दळीच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली.