शहादा l प्रतिनिधी-
शहादा येथील श्री . पी . के . अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने आज दि . ९ ऑक्टोंबर रोजी किसान व विचार मंथनदिनी ‘ पुरूषोत्तम पुरस्कार ‘ मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत .
यंदा संस्था स्तरावर खामगाव जि . बुलढाणाच्या टिळक राष्ट्रीय विद्यालयाची तर व्यक्तिगत पातळीवर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे रा . कोंभाळणे ता.अकोले जि . अहमदनगर यांची निवड करण्यात आली आहे . आज दि . ९ आक्टोंबर रोजी किसान व विचारमंथनदिनी पुरस्कार प्रदान सोहळा मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वश्वरैया सभागृहात होणार आहे . सकाळी साडे नऊ वाजता कोविड १ ९ निर्देशानुसार निमंत्रितांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी दिली आहे . दरम्यान , शनिवार दि . ९ व १० ऑक्टोबर रोजी किसान व विचार मंथन दिनानिमित्त व्हीएसजीजीएम व रोटरी क्लब ऑफ शहादाच्या सहकार्याने मोफत महिलांची कॅन्सर तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात करण्यात आले आहे .