Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेमध्ये बंडखोरी की उमेदवार बदलणार ?

team by team
April 20, 2024
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेमध्ये बंडखोरी की उमेदवार बदलणार ?

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे ऍड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.असे असताना काँग्रेसचे आ.शिरीषकुमार नाईक व त्यांच्या पत्नी माजी. जि.प.अध्यक्षा रजनी नाईक यांनी अर्ज खरेदी केल्याने काँग्रेस मध्ये उमेदवार बदलणार की बंडखोरी होणार याबाबत जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

 

 

नंदुरबार लोकसभेसाठी अनेक इच्छुकांनी मुलाखत दिली होती त्यात नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक व त्यांच्या पत्नी माझी जि. प. अध्यक्ष रजनी नाईक यांनीही मुलाखत दिली होती.राहुल गांधी हे नंदुरबार येथे आल्यानंतर काँग्रेस तर्फ अचानक आमदार एड.के.सी.पाडवी यांचे सुपुत्र ॲड.गोवाल पाडवी यांना काँग्रेस तर्फे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे मुलाखत न देतानाही त्यांचे नाव अचानक पुढे आल्याने नाईक कुटुंबामध्ये याविषयी नाराजी असल्याची चर्चा पुढे आली दिनांक 18 एप्रिल पासून लोकसभेसाठी नामांकन अर्ज विक्रीस सुरुवात झाली.

 

 

 

 

पहिल्या दिवशी आमदार के सी पाडवी व काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी अर्ज खरेदी केले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार शिरीष कुमार नाईक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक यांनीही प्रत्येकी चार अर्ज खरेदी केल्याने उमेदवारी बाबत जिल्ह्यात चर्चांना उधाण आले. खाजगीत आमदार ॲड. के सी पाडवी यांनी अनेक जणांजवळ शेवटपर्यंत अर्ज दाखल झाल्यानंतर शेवटपर्यंत काहीही होऊ शकतं असेही सांगितले आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचा उमेदवार बदलणार की काँग्रेस तर्फे बंडखोरी होईल याबाबत चर्चा रंगले आहेत.

 

 

 

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस तर्फे ॲड. गोवा पाडवी तर भाजपा तर्फे खासदार डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे महायुतीतील मित्रपक्ष शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे अद्याप भाजपाच्या उमेदवारासाठी प्रचारात उतरले नाहीत त्यातच त्यांचा डॉक्टर हिना गावित यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांनी उघड भूमिका घेतली नसती तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचे उमेदवाराचे समर्थन करीत उघडपणे प्रचार यंत्रणा राबवत आहेत.

 

 

 

नवापूर तालुक्यातील शिरीष कुमार नाईक हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत असे असले तरी नंदुरबार जिल्ह्यातील शिंदे गटातील नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

 

 

 

त्यातच धडगाव शहरात शिंदे गटाचा विभागाच्या जिल्हा परिषद चे सदस्य विजय पराडके हे आमदार के सी पाडवी यांचे कट्टर विरोधक आहेत. शिंदे गटाचा खासदार हिना गावित यांना विरोध असल्याने विजय पराडके यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला त्यात कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांना मतदान कसे करायचे आतापर्यंत जे विरोधक होते त्यांनाच मतदान करायचे का असा सवाल करीत तटस्थ राहण्याचे ठरवले. अशा अनेक घटनांमुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक व शिरीष कुमार नाईक यांनी अर्ज तर खरेदी केली नसतील ना ? की काँग्रेस तर्फे ऐनवेळी उमेदवार बदलला जातो याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धनगर आरक्षणाची याचिक सूप्रिम कोर्टाने फेटाळली

Next Post

सीमा तपासणी नाका टाळून जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई : किरण बिडकर

Next Post
सीमा तपासणी नाका टाळून जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई : किरण बिडकर

सीमा तपासणी नाका टाळून जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई : किरण बिडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add