नंदुरबार l प्रतिनिधी
सिंधी दिवस चेट्रीचंड् निमित्त गुरु जो दर येथे सिंधी युवा मंच तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १९३ रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यात महिलांच्या सहभाग उत्स्फूर्त व उल्लेखनीय होता ३० महिलांनी रक्तदान केले रक्तदान साठी सिंधी समाज युवा मंच चे अध्यक्ष संजय मंगलाणी व सदस्य तसेच इतर समाज बांधवांनी सहकार्य केले.
शिबिराची सुरुवात श्री झुलेलाल महाराज यांच्यासह देवताच्या पूजन व आरतीने रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. सिविल हॉस्पिटल नंदुरबार व जनकल्याण रक्तपेढीने रक्त संकलन केले त्यांच्यातर्फे रक्तदात्या प्रति व आयोजकां प्रती आभार प्रदर्शन करण्यात आले.
सिंधी समाज युवा मंच सदस्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिरास विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती देऊन रक्तदान महान दान कार्याबद्दल आयोजकाचे कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही उपक्रम सिंधी समाज युवा माझी तर्फे राबविण्यात आला.
यावेळी कमल ठाकुर यांच्या परिवारा च्या चार ही सदस्यांनी रक्तदान करुन आदर्श निर्माण केला. त्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान नंदुरबार येथील सिंधी समाजा मार्फत चेट्रीचंड् सिंधी दिवस निमित्त सिंधी कॉलनी परिसरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून सिंधी कॉलनी परिसरात रॅलीच्या समारोप करण्यात आला. यावेळी जय झुलेलाल व सिंधी दिवसाच्या विजय असो अशा घोषणा देण्यात आली. शेकडो युवक ध्वज घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते.