नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यात पक्ष कार्याची माहिती जाणून घेत विचारपूसही केली. तसेच नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांना वाढदिवसानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुभेच्छा देवून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.
मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नंदुरबार जिल्हा मनसेच्या पदाधिकार्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष कार्याविषयी चर्चा करुन मार्गदर्शन करीत पुढील कार्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, दिनेश मराठे, दिपक चौधरी, बापू चौधरी, दिपक आण्णा, सिध्दार्थ शहा आदी उपस्थित होते.