नंदुरबार l प्रतिनिधी
शासकीय कामात अडथळा निर्माण करुन कर्मचा-यांना मारहाण करणाऱ्यास शहादा येथील न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी, शहादा येथे तंत्रज्ञ म्हणून नोकरीला असलेले स्वप्नील निंबा बागले रा. म्हसावद ता. शहादा हे नोकरीस असतांना दि. 22 मार्च 2019 रोजी त्यांच्या विभागाच्या वरीष्ठांच्या आदेशान्वये शहादा शहरातील वन विभागासमोरील हरिओम नगर येथे वीजबिल वसूली कामी गेले होते. हरिओम नगर येथील रहिवासी मनोहर हरीचंद्र इंदाईत रा.शहादा यांचेकडेस फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वीजबिल थकीत असल्याने मनोहर इंदाईत यांना सदरचे बील भरणेबाबत फिर्यादी बागले यांनी सांगितले असता त्यांनी दोन दिवसांत बील भरतो असे सांगितले. परंतू मनोहर इंदाईत यांनी यापुर्वी देखील अशाच प्रकारे बील भरतो सांगून त्यावेळी देखील बील भरले नव्हते. त्यामुळे 22 मार्च रोजी फिर्यादी स्वतः व त्यांचे सहकारी असे दोघे मनोहर इंदाईत यांचेकडील विदयुत पुरवठा खंडीत करीत असतांना आरोपी मनोहर इंदाईत यांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना शिवीगाळ करुन मारहाण करुन दुखापत केली. त्याअन्वये शहादा पोलीस ठाण्यात भा.द.वि. ३५३,३३२,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरिक्षक डी.जे. बडगुजर यांचेकडे दिला होता. पोउपनि श्री. बडगुजर व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मनोहर हरीचंद्र इंदाईत रा. शहादा याचे विरुध्द मुदतीत दोषारोपपत्र येथील सत्र न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी. हुळी यांचे समक्ष झाली. सरकार पक्षाचे वतीने सहा. सरकारी अभियोक्ता ॲड. आर.पी. गावीत यांनी काम पाहीले. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली.
त्यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी. हुळी यांनी आरोपीतास भा.द.वि.क. ३५३.३३२,५०४ अन्वये दोषी ठरवत प्रत्येकी २ वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
खटल्याचे सुनावणी दरम्यान पोउपनि सागर नांद्रे, पोउनि छगन चव्हाण यांनी पैरवी अधिकारी म्हणून तसेच पैरवी अंमलदार पोहेकॉ परशूराम कोकणी व पोकॉ देविदास सूर्यवंशी यांनी कामकाज पाहीले. सदर गुन्हयातील तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी अभियोक्ता यांचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे.