नंदुरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील आदर्श आश्रमशाळा (देवमोगरा) या शाळेत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 5 वी साठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर केले असतील अशा विद्यार्थ्यांची प्रवेश पुर्व परिक्षा होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांनी एका शासकी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
ही परिक्षा रविवार 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत शासकीय आश्रमशाळा शिर्वे ता. तळोदा येथे होणार असून परिक्षेसाठी भाषा व सामाजिक शास्त्र 32 गुण, गणित 32 गुण, बुद्धीमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान 36 गुण अशा एकूण 100 गुणांची परिक्षा होणार आहे.
परिक्षा नियमित वेळेत सुरु होणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना परिक्षा केंद्रावर आधार कार्डसह एक तास आधी हजर रहावे. ज्या विद्यार्थ्यांचे आवेदन प्रकल्प कार्यालयास प्राप्त आहेत त्याच विद्यार्थ्यांना परिक्षेस बसता येईल. विद्यार्थ्यांना आपल्या सोबत 1 पेन, पाणी बॉटल, परिक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक साहित्य सोबत नेता येईल. परिक्षेत गैरकृत्य करतांना विद्यार्थी आढल्यास त्यास परिक्षेतुन अपात्र करण्यात येईल, असेही प्रकल्प अधिकारी श्रीमती माथूर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.