नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात कुठेही जात, भाषा, धर्म या आधारावर राजकीय शिबीरे, मेळावे आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (6 जून 2024 पर्यंत) निर्बंध असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम 16 मार्च 2024 पासून घोषित केला असून या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यात जात, भाषा, धार्मिक शिबीरे, मेळावे आयोजनावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.