नंदुरबार l प्रतिनिधी
बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 (सुधारणा 2004) अन्वये स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.
याबाबतीची अधिसूचना 29 जानेवारी 2024 रोजी केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील 5 वर्षांसाठी ही बंदी असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
याविषयी राज्य शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रान्वये कळविण्यात आले असून या कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.