Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारातील कुरेशी मोहल्ला येथे पोलीसांची संयुक्त कारवाई, 18 गोवंशीय जनावरांची सुटका, मालकांवर कारवाई

team by team
April 5, 2024
in क्राईम
0
नंदुरबारातील कुरेशी मोहल्ला येथे पोलीसांची संयुक्त कारवाई, 18 गोवंशीय जनावरांची सुटका, मालकांवर कारवाई

 

नंदूरबार l प्रतिनिधि
नंदुरबार शहरातील कुरेशी मोहल्ला येथुन नंदुरबार शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांचे संयुक्त कारवाईने, 64 हजार रुपये किंमतीचे एकुण 18 गोवंशीय जनावरांची सुटका करुन मालकांवर प्राण्यांना क्रुरतेने वागविण्याच्या प्रतिबंध अधिनियामान्वये कारवाई करण्यात आली.

 

 

नंदुरबार पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये व मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन नंदुरबार शहरातील कुरेशी मोहल्ला, बिस्मील्ला चौकाच्या समोर रस्त्यावर तसेच इतर ठिकाणी गोवंशीय जनावरे कत्तलीकीरता बांधुन ठेवले असल्याबाबतची बातमीची खात्री करुन, संबंधीतांवर कारवाई करणेकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे असे पथक तयार करुन, पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधिक्षक यांनी कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.

 

 

 

त्याप्रमाणे नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वासुदेव देसले हे त्यांचे पथकासह व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी किरणकुमार खेडकर असे त्यांचे पथकासह नंदुरबार शहरातील कुरेशी मोहल्ला येथे जावुन खात्री करत कुरेशी मोहल्ला येथील बिस्मील्ला चौकासमोरील रस्त्यावर, लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये, बोळीमध्ये व एका घरामध्ये अश्या विविध ठिकाणी एकुण 18 गोवंशीय जनावरे यांना त्यांचे मालक इरफान शेख मदरान कुरेशी, सईद हाजी शेख छोटु, जाविद युसूफ कुरेशी, जाकिर शेख सुभान, सर्व राहणार कुरेशी मोहल्ला, नंदुरबार यांनी सदर गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उददेशाने त्यांना वेदना होतील अश्या पध्दतीने निर्दयतने बांधलेल्या स्थितीत मिळुन आल्याने सदर गोवंशीय जनावरे यांना पोलीसांनी ताब्यात घेवुन नमुद घटनास्थळाचा पंचनामा करुन ताब्यात असलेले एकुण 64 रु. किंमातीचे 18 गोवंशीय जनावरे, यांना नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील अरिहंत गोशाळा पांजरपोळ येथे दाखल करुन वर नमुद गोवंशीय जनावरे यांच्या मालकांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याच्या प्रतिबंध अधिनियम 1960 वे कलम 11(1) (एफ) प्रमाणे वेगवेगळे असे 04 गुन्हे नोदं केले असुन सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

 

 

त्याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे. सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे नंदुरबार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शना खाली, नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सपोनि चंद्रकांत पाटील, सपोनि नंदा पाटील, पोउपनि / विकास गुंजाळ, पोउपनि युनूस शेख तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे गुन्हे स्थानिक गुन्हे शोध पथकाचे व स्थनिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार व शहादा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 4 ऐवजी 8 एप्रिलला होणार : मनीषा खत्री

Next Post

एस. ए. मिशन हायस्कूलतर्फे मतदान जनजागृती

Next Post
एस. ए. मिशन हायस्कूलतर्फे मतदान जनजागृती

एस. ए. मिशन हायस्कूलतर्फे मतदान जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add