शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग, केसिआयआयएल आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने “नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्रमुख अतिथी, वक्ते व केसिआयआयएल जळगावचे सी.ई.ओ डॉ समीर पाटील, पोर्टफोलिओ मॅनेजर श्री दर्पण साळुंखे, कृषी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ पी.एल.पटेल, महाविद्यालाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात झाली. यावेळी मयूरभाई पाटील यांनी मार्गदर्शन सांगितले की, औषधनिर्माण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून औषध निर्मिती करता येईल. त्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून संशोधन करावे त्याचप्रमाणे औषधनिर्मिती करतांना विविध तंत्रज्ञानाचा वापर केला तर येणाऱ्या काळात त्याचा नक्कीच सर्वाना फायदा होईल.
भारताला जगात एक विश्वसनीय स्तरावर पोहचवण्यासाठी सर्वांना नवीन तंत्रज्ञान अंगीकृत करून त्याचा वापर करून भारताची अर्थव्यवस्था ही अजून बळकट बनविण्यासाठी हातभार लावता येईल. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन नवतंत्रज्ञान कौशल्य कशा पद्धतीने विकसित करता येईल या कडे लक्ष केंद्रित करावे. कार्यशाळेत सकाळच्या सत्रात प्रमुख वक्ते दर्पण साळुंखे यांनी सांगितले की, नवीन कोण कोणत्या टेक्नोलॉजी सध्या घातल्या आहेत तसेच औषधनिर्माण क्षेत्रात कशा पद्धतीने डेटा एनालायसीस महत्वाचे आहे.
नवीन नवतंत्रज्ञानाचा वापर औषधनिर्माण कंपनीमध्ये येऊ शकते याची ओळख करून दिली. पर्सनलायीझ मेडिसिन, क्रिस्पर टेक्नोलॉजीचा उपयोग आणि थ्रीडी प्रिंटींगचा वापर औषधी तयार करण्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो या विषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ समीर पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थाना अंडरस्टॅण्डिंग ब्लॉक चेन आणि क्रिप्टोकरन्सी कशा पद्धतीनेकार्य करते, वैद्यकीय कोडींग म्हणजे काय? या विषयी संपूर्ण माहिती देऊन त्याचा वापर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कशा पद्धतीने करता येऊ शकतो याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थांचा प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. सदर कार्यशाळेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यशाळेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन, संयोजक, प्रा. योगेश रोकडे यांनी केले तर आभार, संयोजक, प्रा. आकाश जैन यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सौ. अमृता पाटील, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल लोव्हारे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.