Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने टाकली धाड

team by team
October 7, 2021
in राज्य
0
समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने टाकली धाड
नंदुरबार l प्रतिनिधी-
 नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आज दि. ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजेला आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकल्याचे बोलले जात आहे.अचानक टाकलेल्या या धाडीमुळे एकच खळबळ उडाली  कारखान्याचे मालक राज्याचे उममुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.नेमकी पथकाकडून काय चौकशी करण्यात आली हे समजू शकले नाही. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौकशी सुरू असल्याचे समजले.
  राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या मालमत्तेबाबत भाजपाचे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरुन चौकशी सुरू झाल्या आहेत.आज राज्यात पाच ठिकाणी कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या.या धर्तीवर नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एल.एल.पी साखर कारखान्यावर आज  दि. ७ ऑक्टोंबर रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी  धाड टाकली. सदरची धाड का टाकण्यात आली? नेमकी काय चौकशी करण्यात आली? ते समजू शकले नाही. साखर कारखान्याचे गेट बंद केल्याने आतमध्ये जाण्यास कोणालाही परवानगी देण्यात आली नाही.चौकशीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे समजले.  नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर येथे पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सन १९९६ मध्ये  सुरू करण्यात आला होता.मात्र काही वर्षानंतर कारखाना अडचणीत आल्याने व कर्जाचा बोजा वाढत असल्याने शासनाने हा कारखाना अवसायनात काढून विक्री केला. कारखान्याचे मालक श्री. शिंगारे यांनी कारखान्याचे नाव बदलून आयान मल्टीट्रेड साखर कारखाना असे केले. कारखान्याचे मालक  हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. सदर कारखान्याची मालमत्ता सुमारे १५० कोटी रूपयांची असतांना त्याची विक्री अवघ्या ४७ कोटी रूपयांत का करण्यात आली? हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, हा कारखाना खरेदीसाठी मध्यवर्ती बँकेनेही कर्ज दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान आज आयकर विभागाची धाड पडल्यानंतर  सायंकाळी सहा वाजेपर्यंत अधिकारी कारखान्यातच असल्याने व गेट बंद असल्याने नेमकी काय चौकशी करण्यात आली हे समजू शकले नाही.सदरच्या पथकात पाच ते सात अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडल्यानंतर जिल्हाभर याची चर्चा होती.
बातमी शेअर करा
Previous Post

पानी फाउंडेशन मार्फत एक दिवशीय गावकरी प्रशिक्षण

Next Post

भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी खा. हीना गावित यांची दुसऱ्यांदा फेरनिवड

Next Post
भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी खा. हीना गावित यांची दुसऱ्यांदा फेरनिवड

भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी खा. हीना गावित यांची दुसऱ्यांदा फेरनिवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add