नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच शिवसैनिक व युवती सेनेच्या पदाधिकार्यांनी कामाला लागावे. तसेच पक्ष बांधणीसाठी काम करावे, असे प्रतिपादन उबाठा शिवसेनेच्या उपनेता तथा युवासेना कार्यकारणी सदस्य सौ.शितल देवरुखकर शेठ यांनी केले.
नंदुरबार येथील नगरपरिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या तथा युवती सेना कार्यकारिणी सदस्या सौ.शितल देवरुखकर शेठ यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र युवा सेना व युवती सेनेच्या पदाधिकार्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसमन्वयक दीपक गवते, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी, युवासेना विस्तारक कुणाल कानकाटे, युवतीसेना विस्तारक कामिनी देसले, विद्याबाई सरमळकर, सरपंच अशोक पाडवी, युवासेना जिल्हाअधिकारी अर्जुन मराठे, युवासेना उपजिल्हा सागर पाटील, युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे, शिवसेनेचे नवापूर तालुकाप्रमुख कल्पित नाईक, युवती सेना जिल्हाप्रमुख गीता वळवी, प्रियंका पाडवी, उपजिल्हाप्रमुख सुनिता वळवी, चंदा वसावे, नंदुरबार तालुकाप्रमुख भारती ठाकरे, मनीषा नाईक, प्राजक्ता वळवी, गीता पावरा, सुनीता अशोक वसावे, कोकिला मोहन वसावे, सविता वसावे, सुमन वसावे, शीतल वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी सर्व महिला पदाधिकार्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या शितल देवरुखकर यांचा आदिवासी रूढी परंपरेनुसर सत्कार करण्यात आला. या बैठकीत शितल देवरुखकर यांनी नंदुरबार शहर व ग्रामीण भागातील युवती पदाधिकार्यांशी संवाद साधून आढावा जाणून घेतला. तसेच आगामी निवडणूकांसाठी पक्ष बांधणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. बैठक यशस्वीतेसाठी आनंद पाटील, राज पाटील आदींनी परिश्रम घेतले.