Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना न्यायालयात दावा दाखल करण्यास कोर्ट शुल्कातून सुट : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रयत्नांना यश

team by team
February 29, 2024
in राजकीय
0
अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना न्यायालयात  दावा दाखल करण्यास कोर्ट शुल्कातून सुट : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रयत्नांना यश

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना फौजदारी व दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणार्‍या कोर्ट शुल्कातून सुट देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी सदर कोर्ट फीमध्ये सूट देण्याकरीता शासनाकडे पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचा समुदाय हा मागासलेला, गरीब व आर्थिक दृष्ट्या कमजोर आहे. म्हणुन अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना न्यायालयात दावे दाखल करुन स्वतःच्या हक्कासाठी मागणी करणे, पर्यायाने लढणे शक्य होत नाही. तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या कमजोर अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना एकतर कोर्ट फीचा आर्थिक भार सहन करावा लागतो. तसेच सदर कोर्ट फी ची रक्कम भरण्याची त्यांची शक्य नसल्यास वेळीच न्यायालयीन प्रकरण दाखल करण्यास त्यांच्याकडून टाळले जाऊ शकते.

म्हणुन अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणार्‍या कोर्ट फीमधून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागामार्फत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी मंत्रिमंडळात या विषयावर चर्चा करत हा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे.

या प्रस्तावावर विचारविनियम होवून राज्य मंत्रिमंडळाने अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणार्‍या कोर्ट फीमधून सूट देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना न्यायालयात दावे दाखल करणे सोयीचे होणार आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डायट आणि अर्पण संस्थेतर्फे बाल लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी 121 शालेय शिक्षकांना प्रशिक्षण

Next Post

जीवघेणा हल्ला करणा-या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला 2 वर्षांचा कारावास

Next Post
जीवघेणा हल्ला करणा-या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला 2 वर्षांचा कारावास

जीवघेणा हल्ला करणा-या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला 2 वर्षांचा कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add