नंदुरबार l प्रतिनिधी
एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत उत्तम आरोग्य व उत्तम शैक्षणिक प्रगती या विषयावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा रुग्णालय नंदुरबार नितीन मंडलिक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले ह्या व्याख्यानाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी उद्बोधन करून जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे कारण आजची पिढी मोबाईलच्या आकर्षणामुळे सतत मोबाईल स्क्रीनवर ऑनलाईन गेमिंग व सोशल मीडियाच्या वापर करीत एकाच ठिकाणी तांसतास बसून असल्याने मैदानापासून दुरावली आहेत परिणामी ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच मुलांमध्ये लठ्ठपणा व मधुमेह आणि डोळ्यांचे विविध विकार होतांना दिसत आहे.
परिणामी शाळेचे विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण देणे हेच कर्तव्य नसून शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळेकडून ह्या व्याख्यानाचे विशेष आयोजन करण्यात आले यावेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.