नंदुरबार l प्रतिनिधी
शिंदगव्हाण ता. नंदुरबार येथे येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
22 जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई अखंड राम धुन गावातून शोभायात्रा राम मंदिर परिसर सामाजिक चौक सार्वजनिक चौक ग्रामपंचायत कार्यालय आधी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतिचे पदाधिकारी राम मंदिराचे ट्रस्टी शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत .
शिंदगव्हाण येथे 1984 साली संत शिरोमणी दगाजी महाराज यांनी येथे राम मंदिर बांधण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला 1992 साली मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली 2002 साली मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन श्रीराम लक्ष्मण सिताजी हनुमान गणपती व महादेवाच्या मूर्ती जयपूरहुन आणल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 2004 साली काढण्यात आली ऑगस्ट 2004 मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून उत्सव परवानगी घेऊन येथे दरवर्षी शिवरात्रीला यात्रा भरते. 2002 2003 मध्ये मंदिरापुढे सभा मंडपाचे बांधकाम करण्यात आले.
मंदिरात दररोज पूजा आरती केली जाते गावातून दररोज प्रभात फेरी काढली जाते येथे दररोज हरिपाठ घेतला जातो श्रावण महिन्यात रामधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 20 जून रोजी जानेवारी रोजी सकाळी संपूर्ण गावात अक्षदा वाटप करण्यात येणार आहे 22 जानेवारी रोजी दुपारी धार्मिक विधी होऊन सायंकाळी ग्रामस्थ ग्रामस्थातर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.