नंदुरबार ! प्रतिनिधी
भालेर येथे अनोळखी युवकाचा डोक्यात वार करुन खून करणाऱ्या ३ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेतले ताब्यात
या बाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ जुलै रोजी सकाळी ८ वा . सुमारास नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे शासकिय आश्रमशाळेच्या बाजुला असलेल्या शेताच्या बांधालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने स्थानिक नागरीकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन शेतात पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली असता हाफ पँट घातलेला एक अनोळखी पुरुष रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेला होता . तसेच मृत व्यक्तीच्या अंगावर , डोक्यावर मारहाण केल्याच्या व जखमेच्या खूणा होत्या , सदर बाबत नगांव गावाचे पोलीस पाटील प्रशांत सुकलाल मगरे यांचे फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला . घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक , नंदुरबार महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी गुन्हा उघडकिस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या . घटनास्थळावर मयताची ओळख पटु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे , मोबाईल , सी.सी.टी.व्ही . , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती . तसेच सदरचा गुन्हा हा रात्रीच्या अंधारात घडला असलयामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे व मयताची ओळख पटविण्याचे तसेच जिवेठार मारण्याचा उद्देश याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते . वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ५-५ अमलदारांचे ६ पथक तयार केले . स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने घटनास्थळापासुन जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅक पर्यंत पायी शोध मोहिम सुरु केली तसेच एका पथकाने भालेर ते नंदुरबार रेल्वे स्टेशन पर्यंत पायी शोध घेतला , एक पथक घटनास्थळाच्या आजु – बाजुला असलेल्या सर्व गावांमध्ये मयताचा फोटो व त्याच्या हातावर गोंधलेले फोटो दाखवित होते तर एक पथक नंदुरबार रेल्वे स्थानकावरील सी.सी.टी.व्ही . फुटेजची तपासणी करीत होते जेणे करुन मयताची ओळख पटु शकेल हे सर्व करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन दिवस लागुन गेले तरी देखील यश मिळत नव्हते . दि. २८ जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकास दि.२५ रोजी नंदुरबार रेल्वे पोलीस ठाणे येथे ४ इसम हे त्यांच्यातीलच एक इसम हा रेल्वेतुन निघुन गेला असल्याबाबत माहिती देण्यासाठी गेले होते , अधिक माहिती घेतली असता हावडा प.बंगाल येथील ५ इसम भरुच गुजरात राज्य येथे मजूरी करण्यासाठी जात असतांना त्यातील एक तरुण नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरुन गेला अशी त्रोटक माहिती मिळाली . भरुच गुजरात येथे रवाना झाले . भरुच येथे त्या ४ अनोळखी व्यक्तीचा शोध घेवून त्यांना मयताचा फोटो व त्याच्या हातावर गोदलेले दाखविले असता त्यांनी मयतास ओळखुन मयत दिपक सुकरा उराव वय -२६ रा . शिमन लेन , मथुरा , बागान , मथुरा टी गार्डन ता.जि. अलिपुरदुआर जलपैगुडी पश्चिम बंगाल असे सांगितले परंतु सदर मयत इसमाचे मारेकरी कोण ? त्यास का मारण्यात आले ? मारण्याचा उद्देश काय ? मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे होतेच . त्यामुळे मयताच्या चारही मित्रांना भरुच गुजरात येथुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , नंदुरबार येथे आणले व त्यांच्याकडे सखोल विचारणा करुनही गुन्ह्याबाबत व आरोपीतां बाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती . गुन्हा घडुन ४ दिवस झाले होते तरी पथकांना यश येत नव्हते . दि.३० जुलै रोजी एक गुप्त बातमीदाराने बातमी मिळाली की , दि.२५ रोजी रात्रीच्या सुमारास भालेर येथील नविन वस्तीगृहाचे सुरु असलेल्या बांधकामाजवळील रस्त्यावर भिक्या रा . भालेर ता.जि. नंदुरबार व त्यासोबत – इसम एका तरुणाला मारहाण करीत होते . त्यावरुन भालेर गावात भिक्या नावाच्या व्यक्तीची माहिती काढुन शोध घेवुन त्यास शेतातुन ताब्यात घेतले . त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव भिका गैदल पाटील वय -२६ रा . भालेर ता.जि. नंदुरबार असे सांगितले . त्यास घडलेल्या घटनेबाबत विचारपुस केली असता सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सांगीतले की , दि.२५ जुलै रोजी रात्री ९ ते ९ .३० वा . दरम्यान तो तसेच प्रकाश हिरामण पाटील व मुकेश गैंदल पाटील असे मोटार सायकलने नंदुरबारकडे जात असतांना रस्त्यात एका अनोळखी तरुणाने त्यांना भालेर गावाचे प्राथमीक आरोग्य केंद्राच्या पुढे शिवीगाळ करुन प्लॅस्टीकच्या पाईपने मारण्याचा प्रयत्न केला . त्यावरुन त्यांच्यात वाद विवाद होवुन त्या तिघांनी अनोळखी तरुण यास लाकडी काठी , दगड हाता बुक्क्यांनी मारहाण केली त्यास अनोळखी इसमाने देखील प्रतिकार केला व तिन्ही आरोपीतांच्या ताब्यातुन तो इसम पळुन तेथुन वस्तीगृहाचे बाजुला असलेल्या शेताकडे गेला . त्यानंतर तिघांनी त्याच पाठलाग करुन त्यास वस्तीगृहाच्या बाजुला असलेल्या शेतात पकडले व तेथे पुन्हा मारहाण करुन डोक्या लाकडी काठी मारुन गळा आवळला , त्यामुळे अनोळखी इसम मयत झाला . त्यानंतर मुकेश गैंदल पाटील वय -३६ रा . भालेर ता.जि. नंदुरबार व प्रकाश हिरामण पाटील वय- रा . भालेर ता.जि. नंदुरबार असे पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांनी देखील सुरुवातील उडवा उडवीची उत्तरे दिल परंतु त्यांना देखील विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे उघड झाले . कुठल्याही प्रकारचा पुरावा , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार , तांत्रिक पुरावा , सी.सी.टी.व्ही . कॅमेरे नसतांना क्लिष्ठ अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे . ताब्या घेतलेल्या तिन्ही आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उप – विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप – अधीक्षक ( गृह ) देवराम गवळी , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तात्पुरते प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व संपुर्ण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सर्व अमलदारांनी केली आहे .