नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार ! प्रतिनिधी
धामडोद, ता. जि. नंदुरबार या गावातील मूळचे रहिवाशी डॉ. महेश धर्मा बोराणे हे त्यांचे रसायनशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण व पी. एच. डी. चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ठाणे येथील UPL Ltd. Thane या नामांकित अशा मल्टी नॅशनल कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. या पदावर असताना त्यांच्या या कामाचा अनुभव, नोकरीतील निष्ठा, प्रामाणिकपणा व मेहनतीची दखल सदर कंपनीने घेतली असून कंपनीकडून डॉ. महेश बोराणे यांना डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात अतिशय आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. डॉ महेश बोराणे यांना कंपंनीने ब्राझिल या देशात दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार केली असून त्यांना ब्राझिल देशात ४ ते ५ वर्षे नोकरीचा तगडा अनुभव आहे.
धामडोद, ता. जि. नंदुरबार या गावातील मूळचे रहिवाशी डॉ. महेश धर्मा बोराणे हे त्यांचे रसायनशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण व पी. एच. डी. चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ठाणे येथील UPL Ltd. Thane या नामांकित अशा मल्टी नॅशनल कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. या पदावर असताना त्यांच्या या कामाचा अनुभव, नोकरीतील निष्ठा, प्रामाणिकपणा व मेहनतीची दखल सदर कंपनीने घेतली असून कंपनीकडून डॉ. महेश बोराणे यांना डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात अतिशय आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. डॉ महेश बोराणे यांना कंपंनीने ब्राझिल या देशात दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार केली असून त्यांना ब्राझिल देशात ४ ते ५ वर्षे नोकरीचा तगडा अनुभव आह
नंदुरबार सारख्या छोट्याशा शहरात आपले पदवीचे शिक्षण पुर्ण करुन डॉ. महेश बोराणे यांनी पदव्युत्तर व पी. एच. डी. चे शिक्षण जळगाव येथील विद्यापीठात पुर्ण केले आहे. डॉ.महेश बोराणे हे हल्ली सदर नोकरीच्या अनुषंगाने कल्याण येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील धर्मा शिवराम मराठे (बोराणे) हे देखील कृषी विभागात कृषी सहाय्यक या पदावर सेवानिवृत्त झाले आहेत. व ते सध्या गावाकडे शेती व्यवसाय करतात. तर त्यांचे मोठे भाऊ मुकेश धर्मा मराठे ( बोराणे) हे नंदुरबार पोलीस विभागात पोलीस म्हणुन नोकरीस आहेत.
डॉ.महेश धर्मा बोराणे यांच्या पदोन्नतीच्या यशाबद्दल त्यांचे आई-वडील सर्व कुटुंबीय, आप्तेष्ट नातेवाईक, मित्र परिवार, त्यांच्या धामडोद गावातील गावकरी तसेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील समाजबांधव यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांना पुढील नव्या पदाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.