Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या समोर मंत्री डॉ. गावित यांनी मांडला तापी, बुराई पाणी योजनेचा प्रश्न

team by team
November 16, 2023
in राजकीय
0
राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या समोर मंत्री डॉ. गावित यांनी मांडला तापी, बुराई पाणी योजनेचा प्रश्न

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्याच्या जनजाती गौरव सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून शानदार शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी केलेल्या भाषणातून राज्यपाल रमेश बैस यांनी आदिवासी समूहांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकार काय करीत आहे याची महत्त्वपूर्ण माहिती दिली, तर आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यासोबतच नंदुरबार चा दुष्काळी प्रश्न मांडला शिवाय नंदुरबारचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नव्या तापी योजनेला मान्यता द्यावी तसेच तापी बुराई योजनेचे शिल्लक राहिलेले 25 टक्के काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक मंजुरी द्याव्या; अशी जाहीर विनंती केली.

 

 

नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर आज दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड, येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी हा जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला असून हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध भागातील आदिवासी ग्रामस्थ आणि कला संस्कृती क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहिले.

 

 

उद्घाटन सोहळ्याला मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, राज्यपाल यांच्या सचिव श्वेता सिंघल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री विविध यंत्रणांचे अधिकारी, पदाधिकारी, अधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

आदिवासी समूहासाठी केंद्र आणि राज्य सरकार काय करत आहे हे सांगताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर प्रथमच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस “आदिवासी जनजातीय गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभाग १ हजारहून अधिक शाळा चालवत आहे. राज्यात ४९९ सरकारी आश्रमशाळा आणि ५३८ सरकारी अनुदानित आश्रमशाळा आहेत. तसेच ७३ ‘नमो शाळा’ आहेत, ज्या विज्ञान केंद्र म्हणून आज कार्यरत आहेत. सुपर-५० प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘जेईई’ आणि ‘एनईईटी’ परीक्षांसाठी तयार केले जात आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीही दिली जात आहे. ‘मेस्को’ सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्रे चालवत आहे.

 

 

घरकुल व स्मशानभूमीला जागा देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आदिवासी बांधवांच्या संस्कृतीत आपल्या मातीचा गंध आहे. आजच्या हवामान बदलाच्या आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात प्रत्येकाने आदिवासी समाजाची जीवनशैली आणि वनसंवर्धनाबाबतची त्यांची जिद्द यापासून धडा घेण्याची गरज आहे. राज्यातील आदिवासी बहुल १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवित आहोत. एकूण ५ हजार कोटी रुपयांची ही योजना असून ६ हजार ८३८ किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेतून बांधले जाणार आहेत. नंदुरबार जिल्हा आपल्या स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा करत असून येणाऱ्या काळात या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच येथील घरकुल व स्मशानभूमींना जागा देण्यासाठी येणाऱ्या काळात नियोजन केले जाईल. तापी नदीवरून पाणीपुरवठा योजनेसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासोबतच दुष्काळाच्या परिस्थितीत शासन जिल्हावासीयांच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

 

 

दुष्काळ सवलती आणि तापी योजनेला मान्यता द्या -डॉ. विजयकुमार गावित

यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, देशात वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात आपले राज्य अग्रस्थानी आहे. आजतागायत मान्य करण्यात आलेल्या वैयक्तिक वन हक्क दाव्यांची संख्या १ लाख ९८ हजार ९९१ असून १ लाख ९८ हजार २३२ मान्य दावेधारकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. आणखी वैशिष्ट्यपूर्ण बाब ही की, देशात आपल्या राज्याने स्वतंत्रपणे पुढाकार घेत सकारात्मक निर्णय घेऊन, जिल्हास्तरीय समितीने अमान्य केलेल्या दाव्यांसाठी या प्राधिकरणाकडे दाद मागण्याची संधी दावेदारांना शासनाने उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी व मागास घटकांच्या विकासाच्या सामुहिक, वैयक्तिक लाभाच्या सुमारे २०० योजनांची माहिती देऊन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले की नंदुरबार तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे तथापि विज बिल माफी सारख्या आणि कर्जमाफी सारख्या सर्व सवलती प्राप्त होणे आवश्यक आहे. नवी तापी योजना मंजूर झाली तर नंदुरबार वर आलेले पाणी संकट नाहीसे होईल म्हणून त्या योजनेला मान्यता द्यावी तसेच तापीपुराईचे काम 75 टक्के झालेले असून 25 टक्के बाकी आहे त्यासाठी आवश्यक मंजुरी द्यावी, अशी जाहीर विनंती मंत्री डॉक्टर गावित यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना केली.

बातमी शेअर करा
Previous Post

विकसित भारत संकल्प यात्रेच्या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ नंदुरबारमधून

Next Post

राज्यस्तरीय जनजाती गौरव सोहळ्याचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार प्रारंभ

Next Post
राज्यस्तरीय जनजाती गौरव सोहळ्याचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार प्रारंभ

राज्यस्तरीय जनजाती गौरव सोहळ्याचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add