नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणार्या विरचक धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. दि .७ ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडला नाही तर नवरात्रीपासुन शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असुन जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ . रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयामध्ये आजपर्यंत पाऊस ५० टक्के सुध्दा झालेला नाही . तसेच नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणार्या विरचक धरणामध्ये मागील वर्षाचेच पाणी शिल्लक असुन एक फुट सुध्दा पाण्याचा पातळीत वाढ झालेली नाही . अद्याप नंदुरबार जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहीत झालेले नसुन दुर्दैवाने शिवण नदीला सुध्दा पुर आलेला नाही . शिवण नदीवरील विरचक धरणाचा अगोदर असलेला खोलघर धरण ५० टक्के भरले असुन ते धरण भरल्या शिवाय विरचक धरणामधील पाण्याचा पातळीत वाढ होणार नाही . भविष्यातील सर्व संकटांचा विचार करुन जर दि .७ ऑक्टोबर , २०२१ या तारखेपर्यंत पाऊस पडला नाही तर नवरात्री पासुन नंदुरबार नगर परिषदेणे शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असुन जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच नंदुरबार नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ . रत्ना चंद्रकांत रघुवंशी , उपनगराध्यक्ष रविंद्र अशोक पवार , पाणी पुरवठा सभापती कैलास हिम्मतराव पाटील तसेच नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे .