Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

team by team
July 19, 2023
in क्राईम
0
सिंदगव्हाण येथे जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

नंदूरबार l प्रतिनिधी

 

खोट्या नावाने पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायीत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनकि प्राधिकरणांच्या नियंत्रणाखाली माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून नागरिकांसाठी माहिती मिळविण्याच्या अधिकाराची व्यावहार्य शासन पध्द्त आखून देण्यात आली आहे. त्याचा वापर करुन माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद असलेली माहिती वगळता नागरिक विविध शासकीय, सार्वजनिक प्राधिकरणांमधील माहिती एका अर्जाद्वारे प्राप्त करुन घेवू शकतात. त्याकरीता केंद्रीय माहितीचा अधिकार सन 2005 अंमलात आला आहे.

 

 

दि. 6 जुन रोजी सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार या नावाने पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमान्वये माहिती मिळणेकामी अर्ज सादर केला होता.

 

 

अर्जदार सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार यांनी मागणी केलेली माहिती त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठविण्यात आली होती, परंतु 12 जुलै रोजी पोस्ट विभागाकडून पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे कळविण्यात आले की, बागवान गल्ली, नंदुरबार येथे सलीम सुलेमान बागवान या नावाचा कोणताही व्यक्ती राहत नाही.

 

माहितीचा अधिकार अधिनियमान्वये अर्जदार यांनी मागितलेली माहिती देणे संबंधीत शासकीय विभागाला बंधनकारक असते म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार या इसमाचा शोध घेवून त्यांना माहिती देण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांना आदेशीत करण्यात आले.

 

या माहिती अधिकारातील अर्जाबाबत व व्यक्तीबाबत संशय आल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने देखील गोपनीय माहिती काढली असता सलीम सुलेमान बागवान या नावाचा कोणीही इसम नंदुरबार शहरातील बागवान गल्ली व परिसरात राहत नसल्याचे निदर्शनास आले. टपाल विभागाच्या पोस्टमननेही असा व्यक्ती त्या पत्त्यावर नसल्याचा अहवाल दिला. पोलीसांना त्रास होईल या उद्देशाने खोट्या नावाने केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमान्वये काही माहितीची मागणी केली म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे खोट्या नावाने माहिती मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलीस प्रशासनास खोटे नाव सांगून माहिती मागुन पोलीस विभागाच्या वेळेचा अपव्यय करुन त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे नाव, पत्ता वापरणाच्या अज्ञात इसमाचा कसोशीने शोध घेवून त्याचेवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

 

 

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमाचा कोणीही गैरवापर करु नये. सार्वजनकि किंवा शासकीय प्राधिकरणांमधील माहिती प्राप्त करुन घेणे हा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार असला तरी खोट्या नावाने अथवा खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने अनावश्यक माहिती मागून शासकीय यंत्रणेच्या वेळेचा व पैश्याचा अपव्यय करणाऱ्या तसेच प्रशासनास व त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसे आढळून आल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

ब्रेकिंग न्युज:नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्षपदी निलेश माळी यांची नियुक्ती

Next Post

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेसह अस्वच्छता

Next Post
तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेसह अस्वच्छता

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेसह अस्वच्छता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add