Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेसह अस्वच्छता

team by team
July 19, 2023
in राजकीय
0
तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेसह अस्वच्छता

नंदुरबार l प्रतिनिधी

 

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांची झालेली प्रचंड दुरावस्था व शाळेत निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. म्हणुन आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांची त्वरीत दुरुस्ती करुन साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम नुरला पावरा यांनी केली आहे.

 

 

 

याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा सुरु आहे. या आंतरराष्ट्रीय शाळेत दुर्गम व अतिदुर्गम भागातील 1600 हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु सदर आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा असलेल्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या स्वच्छतागृहातील शौचालयांची पाईप लाईन तुंबल्याने शाळेमधील स्वच्छतागृह हे अस्वच्छतेने पुर्णतः खराब झालेले आहे.

 

 

स्वच्छतागृहातील दरवाजे तुटलेले आहेत. शौचालयासाठी असलेले स्वच्छतागृह हे घाणीने तुंबलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरील परिसरात शौचालयासाठी जावे लागत असून शाळेतील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. परंतु याच आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहांची दयनिय अवस्था झाली आहे.

 

 

अगोदरच आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळत नाही. त्यातच आता आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था झालेली असल्याने शाळेत दुर्गंधी पसरली असून घाणीचेही साम्राज्य निर्माण झाले आहे. शाळेसह परिसरातही अस्वच्छतेचा अभाव दिसून येत असून घाणीच्या साम्राज्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित प्रशासन व शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

 

 

याकडे आपल्या स्तरावरुन लक्ष देवुन तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेतील दुरावस्था व तुंबलेल्या स्वच्छतागृहांची त्वरीत दुरुस्ती करावी. तसेच शाळेसह परिसराची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन परिसरात औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम नुरला पावरा, मलगावचे सरपंच अमित पाडवी, चाँदसैलीचे सरपंच प्रशांत पटले यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनाची दखल घेत नंदुरबार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी लागलीच कार्यवाहीचे आदेश दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून

Next Post
पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून

पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add