नंदुरबार l प्रतिनिधी
धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्थांनाच पत्रकार संघटना गृहीत धरून अधिक स्वीकृती समितीवर सदस्यांना नियुक्ती देण्यात आली आहे व संघटना संस्थांनाच संघटना गृहीत धरले आहे याबाबत चौकशी करून चुकीचे प्रस्ताव मंजूर करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहे.
17 जुलै 2023 रोजी सदर निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे, विभागाचे प्रवीण सपकाळ व किशोर रायसाकडा यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले असून या निवेदन देणाऱ्यांमध्ये विशाल माळी विभागीय सरचिटणीस, जगदिश सोनवणे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ज्ञानेश्वर माळी, गौतम बैसाणे, जितेंद्र जाधव, प्रशांत जव्हेरी, आजीम हासमी, ज्ञानेश्वर गवळे, हाफिक मिर्झा प्रवीण चव्हाण, आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर पत्रकार बांधवांची यावेळी उपस्थिती होती
धर्मादाय आयुक्त यांच्याकडे 1860 सोसायटी आणि 1950 ट्रस्ट कायद्याअंतर्गत सेवाभावी संस्थांची नोंदणी केली जाते तर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मानधन पगार घेणाऱ्या कामगारांसाठी कामगार कायदा 1926 अंतर्गत नोंदणी केली जाते कामगार विभागाकडेच संघटनेची नोंदणी करून आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन मागणी उपोषण करण्याचा अधिकार मिळतो सार्वजनिक न्यासा अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्था या सेवा म्हणूनच काम करतात सेवाभावी संस्था आणि श्रमिक संघटनांसाठी स्वतंत्र विभाग आणि कायदे आहेत असे असताना माहिती आणि जनसंपर्क विभागासह सामान्य प्रशासन विभागानेही कोणतेही खातरजमा न करता काही लोकांच्या प्रभावामुळे चुकीच्या पद्धतीने अधिस्वीकृत समिती सदस्यांची नियुक्ती केली आहे.
त्यामुळे चुकीच्या पद्धतीने सस्थांना संघटना सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया अधिकार्यावर तात्काळ कार्य करावी आणि नियमानुसार कामगार आयुक्त यांच्याकडे कामगार कायदे अंतर्गत नेहमी देण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून केलेल्या करण्यात आली आहे.सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा माहिती अधिकारी अकोला यांना देण्यात आले आहेत








